अमित शहा यांनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची घेतली भेट

पुणे :  पोलीसनामा ऑनलाइन
भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी आज पुण्यात एका कार्यक्रमासाठी आले असताना त्यांनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची भेट घेतली. अमीत शहा यांनी संपर्क फॉर समर्थन या उपक्रमा अंतर्गत त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली.

केंद्र सरकारच्या मागील चार वर्षाच्या कामगिरीची पुस्तिका देशातील अनेक व्यक्तींना भारतीय जनता पक्षाचे नेते मंडळी देताना सद्या दिसत आहे. तर आज पुण्यात एका कार्यक्रमासाठी राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आले होते. त्या दरम्यान शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या घरी जाऊन भेट घेतली. या भेटी दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे आणि पालकमंत्री गिरीश बापट हे देखील उपस्थित होते.

अमित शहा आणि शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्यात विविध विषयांवर चर्चा देखील झाल्याचे समजते.