CAA : भारतात राहण्यासाठी ‘भारत माता की जय’ म्हणावेच लागेल, केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधानांनी सांगितलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नागरिकत्व दुरूस्ती कायद्यावरून देशभरात वातावरण तापले असून ठीकठिकाणी या कायद्याच्या विरोधात आंदोलन केली जात आहे. त्यात आता केंद्रीय मंत्री धमेंद्र प्रधान यांनी आंदोलकांना विरोध करताना केलेल्या टीकेमुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. ‘भारत माता की जय’ बोलतील तेच भारतात राहतील, असे वादग्रस्त विधान धमेंद्र प्रधान यांनी केले आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यक्रमात बोलत होते.

धमेंद्र प्रधान यावेळी उपस्थितांना प्रश्न करत म्हणाले, तुम्हाला भारताची धर्मशाळा बनवायची आहे का ? ज्या ठिकाणी कुणालाही कुठेही राहता आणि फिरता आले पाहिजे. त्यामुळे आम्हाला हे आव्हान स्वीकारवे लागणार आणि निश्चित करावे लागणार की, भारतात केवळ तेच लोक राहू शकतात जे भारत माता की जय बोलण्यास तयार आहेत.

शहीद भगत सिंह, सुभाषचंद्र बोस यांच्या सारख्या महापुरूषांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या जीवाची बाजी लावली आहे. त्यांचे बलिदान असेच विसरून चालणार नाही. त्यामुळे या सर्वांना आठवून आपल्याला एक निर्णय घेतला पाहिजे की, देशात राहणाऱ्या व्यक्तीला भारत माता की जय म्हणावेच लागले, असे धमेंद्र प्रधान यांनी यावेळी म्हटलं आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/