‘आधार कार्ड’ मिळणे झाले अधिक सोपे, लांबच लांब रांगांपासून मिळणार ‘सुटका’

वृत्तसंस्था – आता आधार कार्ड नवीन काढणे अथवा त्यात बदल करणे अधिक सुलभ होणार आहे. पूर्वी आधार कार्ड काढायचं म्हटलं की, मोठ- मोठ्या रांगांमध्ये दिवसभर ताटकळत थांबावे लागत असे. आता भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) ने देशभरातील दिल्ली, भोपाळ, आग्रा, हिसार, चेन्नई, चंदिगढ आणि विजयवाडा या ७ शहरांमध्ये आधार सेवा केंद्र सुरु केले आहेत.

हि आधार सेवा केंद्रे पासपोर्ट सेवा केंद्राप्रमाणेच काम करणार आहेत. ज्या ठिकाणी एक अर्जदार वेगवेगळ्या सुविधांसाठी ऑनलाईन अपॉइंटमेंट घेऊ शकतो. येत्या काळात गुवाहाटी आणि पटणा या शहामध्ये अशीच आधार सेवा केंदे सुरु होणार आहेत. तसेच पुढच्या काही दिवसात अशाच प्रकारची ११४ आधार सेवा केंद्र वेगवेगळ्या शहरांमध्ये सुरु होणार आहेत. ही सेवा देशातील ५३ शहरांमध्ये सुरु होणार आहे. ज्या वर ३०० ते ४०० कोटी रुपयांचा खर्च होईल असा अंदाज वर्तवला जात आहे.

आधार सेवा केंद्रावर उपलब्ध असलेल्या सुविधा

हे एक विशिष्ट प्रकारचे केंद्र असेल ज्या ठिकाणी दिवसाला तब्बल १,००० लोकांना सेवा देणे अपेक्षित आहे. महत्वाचं म्हणजे आधार कार्ड साठी नोंदणी करणे मोफत आहे परंतु , आधार कार्ड अपडेट करण्यासाठी ५० रुपये दयावे लागणार आहेत. आधार सेवा केंद्र सकाळी ९ वाजता सुरु होऊन सांयकाळी ६ वाजता बंद होणार आहे. मंगळवारी मात्र आधार सेवा केंद्र बंद असणार आहे.

पासपोर्ट सेवा कार्यालयात ज्या प्रकारे अगोदर नोंदणी करता येते त्यानुसार तारीख आणि वेळ भेटते त्याच प्रकारे हे केंद्र काम करणार आहे. आधार सेवा केंद्रावर नवीन आधार कार्ड काढणे किंवा आपले नाव पत्ता यात बदल करणे, तसेच आपला मोबाईल नंबर अपडेट करणे, जन्मतारीख दुरुस्त करणे, जेंडर अपडेट करणे, बायोमेट्रिक अपडेट करणे (फोटो,फिंगरप्रिंट, आयरिस), ईमेल नोंदवणे, करता येणार आहे.

नोंदणीसाठी अशी घेऊ शकाल ऑनलाईन अपॉइंटमेंट

– ऑनलाईन अपॉइंटमेंट घेण्यासाठी सर्वात प्रथम भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI ) च्या वेबसाईट ( https://uidai.gov.in ) ला भेट द्यावी लागेल.

– होम पेज उघडले जाईल, त्यात पहिले सेक्शन आहे My Aadhaar त्यावर कर्सर ठेवून खाली दुसऱ्या क्रमांकाला Book an Appointment हा पर्याय भेटेल. त्यावर क्लिक करा.

– आता बुकिंग चे पेज उघडले जाईल. या ठिकाणी आपले शहर किंवा विभाग निवडावा. आता नवीन पेज वर आपल्या गरजेनुसार हवी असलेली सेवा निवडावी.

– या ठिकाणी आपला मोबाईल क्रमांक आणि केपचा कोड भरावा लागेल.

– यानंतर ओटीपी (One time password ) जनरेट होईल

– यानंतर पुढे आपणास ऑनलाईन अपॉइंटमेंट डिटेल मिळतील.