Covid-19 Test : 90 मिनिटांत मिळेल टेस्टचा अचूक ‘अहवाल’, नवीन संशोधनात दावा

नवी दिल्लीः वृत्तसंस्था – संशोधकांनी 90 मिनिटांमध्ये होणारी हाय-स्पीड कोविड -19 चाचणीची प्रक्रिया शोधली आहे, ज्यासाठी लॅबची आवश्यकता भासणार नाही आणि मोबाईल फोनवरून छोट्या काट्रिजद्वारेही केली जाऊ शकते. हा अभ्यास लॅन्सेट मायक्रोब या जर्नलमध्ये प्रसिद्ध झाला आहे. यामध्ये असे आढळले आहे की, लॅब-इन-कार्ट्रिज वेगवान चाचणी डिव्हाइस रुग्णाच्या पलंगाजवळ ठेवता येते आणि हे कोविड -19 चाचणीच्या 94 टक्के संवेदनशीलता आणि 100 टक्के अचूकतेचा परिणाम देते.

तसेच, हा कोणताही संशयास्पद परिणाम देणार नाही. चाचणीसाठी, रुग्णाच्या नाकातून स्वॅब घेऊन ते डिव्हाइसमध्ये घालावे लागेल. यात SARS-CoV-2 च्या जनुकाची चाचणी घेतली जाते ज्यामुळे कोविड -19 हा आजार होतो. या चाचणीची गुणवत्ता अशी आहे की, त्याचा निकाल केवळ 90 मिनिटांत प्रकट समोर येतो. सद्य चाचणी प्रक्रियेस 24 तास लागतात.

ब्रिटनच्या किंग्ज कॉलेज, लंडनचे संशोधक ग्राहम कुक यांनी सांगितले की, हे अचूक चाचणी अहवाल देतात. अभ्यासानुसार, हे उपकरण कोविड -19 संदिग्ध 280 NHS कर्मचार्‍यांवर वापरले गेले. वेगवान चाचणी डिव्हाइस ‘CovidNudge test’ आणि स्टॅंडर्ड हॉस्पिटल लॅब उपकरणांच्या परिणामाची तुलना केली गेली. या निकालात 67 पॉझिटिव्ह घटनांची नोंद झाली परंतु प्रमाणित प्रयोगशाळेच्या यंत्रणांच्या निकालात 71 प्रकरणे सकारात्मक आढळली.

जागतिक स्तरावर, शुक्रवारी पहाटेपर्यंत जगभरात कोविड -19 संक्रमित लोकांची संख्या 30 कोटीच्या पार गेली आहे. अमेरिकेच्या जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाने ही माहिती दिली. विद्यापीठाच्या आकडेवारीनुसार, कोविड – 19 मुळे जगभरात एकूण 9 लाख 44 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. संक्रमित देशांच्या यादीत अमेरिका पहिल्या क्रमांकावर आहे. येथे संक्रमित झालेल्यांची एकूण संख्या 66 लाख 74 हजार 70 असून मृतांचा आकडा 1 लाख 97 हजार 615 आहे.