‘त्या’ संस्थेने मोकाट कुत्री पकडण्याचे काम थांबवलं

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – शहरात मोकाट कुत्र्यांचा त्रास वाढलेला असताना महापालिकेने कुत्री पकडून त्यांचे निर्बीजीकरण करण्याचा ठेका दिलेल्या युनिर्व्हसल अ‍ॅनिमल वेल्फेअर सोसायटीने त्यांचे काम थांबवले आहे. महापालिकेकडून थकीत ६२ लाख रुपये मिळत नसल्याने त्यांनी हा निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात आले आहे.

शहरात मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात बालके जखमी होण्याच्या घटना घडत आहेत. शहरात मोकाट कुत्र्यांचा प्रश्न गंभीर मंडेला असतानाच कुत्र्यांना पकडून त्यांचे निर्बीजीकरण करण्याचे काम करणाऱ्या संस्थेचे मागील वर्षापासूनचे या कामाचे महापालिका प्रशासनाकडे ६२ लाख रुपये थकले आहे. त्यामुळे युनिर्व्हसल अ‍ॅनिमल वेल्फेअर सोसायटीने त्यांचे काम कालपासून थांबवले आहे. मागील वर्षभरात ४ हजार ३२ कुत्री पकडून त्यांचे निर्बीजीकरण केल्याचे सांगितले जाते. तीन महिन्यांपूर्वी म्हणजे ३१ मार्च २०१९ रोजी या संस्थेच्या कामाची मुदत संपल्यानंतरही नवी मुदतवाढही दिली गेलेली नाही.

पैसे मागणीबाबत वारंवार प्रशासनाला पत्रे देऊन व आरोग्य विभागाला संपर्क साधूनही दाद मिळत नाही. कुत्री निर्बीजीकरण करण्यासाठी नगर तालुक्यातील पिंपळगाव माळवी येथील ताब्यात असलेली महापालिकेची जागाही ही संस्था आज सोडणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. महापालिका हद्दीतील मोकाट कुत्री पकडणे, श्वान निर्बीजीकरण केंद्र पिंपळगाव माळवी येथे नेऊन त्यांच्यावर निर्बीजीकरण शस्त्रक्रिया करून औषधोपचार, खानपान, अँटीरेबीज लसीकरण करून श्वान पुन्हा मूळ जागी सोडण्यासाठी स्वतःची वाहने, कर्मचारी, डॉक्टर व अन्य सुविधांसह सुरू असलेल्या कामाचे देयक अदा करण्यात आले नसल्याने हे काम थांबवत असल्याचे संस्थेने महापालिका प्रशासनाला कळवले आहे.

पावसाळ्यात केसांची विशेष काळजी घ्या, कारण …

पावसाळ्यात मक्याचं कणीस खाण्याचे अनेक फायदे

पावसाळ्यात येणारी ‘ही’ भाजी आहे सर्वात पौष्टिक ; खा आणि रोगमुक्त व्हा

पावसाळ्यात माशांमुळे पसरू शकते रोगराई, असा टाळा उपद्रव

‘या’ कारणामुळे पावसाळ्यात ‘डोळ्यांच्या समस्या’ निर्माण होतात

य़ेरवडा कारागृहात टोळीयुद्ध जोमात, नक्की चाललंय तरी काय ?

महाआघाडीच्या अडचणीत वाढ,वंचितनंतर ‘हा’ पक्षही देणार धक्का ?