CM योगींना पुन्हा एकदा धमकी, 24 तासात संपवेन, हिंमत असेल तर शोधून दाखवा; अज्ञाताचे खुले ‘आव्हान’

लखनऊ : पोलीसनामा ऑनलाईन – उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (cm yogi aadityanath) यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. ‘योगी आदित्यनाथ यांची 24 तासात हत्या केली जाईल, हिंमत असेल तर शोधून दाखवा. एके 47 ने 24 तासांच्या आत त्यांना मारुन टाकेन, अशी धमकी देण्यात आली आहे. 112 कंट्रोल रुमच्या व्हॉट्सऍप नंबरवर धमकीचा मेसेज पाठवला आहे. धमकीचा मेसेज आल्यानंतर अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली. प्रकरणाची गंभीरता लक्षात घेत 112 मध्ये तैनात ऑपरेशन कमांडर सहेंद्र यादव यांनी सुशांत गोल्फ सिटी पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल केला आहे.

पोलिस कंट्रोल रुमच्या 112 व्हॉट्सऍप नंबरवर शनिवारी रात्री 8 वाजून 7 मिनिटाला एका मोबाईल नंबरवरुन मेसेज आला. यात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. यात म्हटले होते की, ”योगी आदित्यनाथ यांची 24 तासात हत्या केली जाईल, हिंमत असेल तर शोधून दाखवा. एके 47 ने 24 तासांच्या आत त्यांना मारुन टाकेन, अशा धमकीचा मेसेज आला. या प्रकरणी पोलिसांची सर्वेलन्स टीम आणि काईम ब्रँच मेसेज पाठवण्याचा शोध घेत आहे. डीसीपी साऊथ रवी कुमार यांच्यानुसार आतापर्यंतच्या तपासानुसार कळते की, धमकी देणारा व्यक्ती दुसऱ्या शहरातील आहे. मेसेज पाठवलेल्या मोबाईल नंबरविषयी पूर्ण माहिती मिळाली आहे. पण पोलिसांनी अधिक माहिती देणे टाळले. मात्र धमकी देणाऱ्याला लवकरच पकडले जाण्याची शक्यता आहे.

दरम्यान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना यापूर्वीही अनेकदा धमक्या आल्या आहेत. अनेकांनी त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. योगी आदित्यनाथ दहशतवाद्यांचे हिट लिस्टवर आहेत. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेची विशेष काळजी घ्यावी लागते. योगी आदित्यनाथ यांच्या सुरक्षेमध्ये उत्तरोत्तर वाढ केली आहे.