उन्नाव प्रकरण : दोन्ही मुलींनी विष घेतल्याचे स्पष्ट

उन्नाव : पोलीसनामा ऑनलाइन –  उत्तर प्रदेशातील उन्नाव येथील अल्पवयीन भाची-आत्याचा मृत्यू झाला होता. आता त्यांचा शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाला असून, यामध्ये दोन्ही मुलींनी विष घेतल्याचे स्पष्ट झाले. पण हा विषारी पदार्थ नेमका कोणता होता, याबाबतची माहिती अद्याप समजू शकली नाही. कानपूरच्या एका रुग्णालयात दाखल असलेल्या आणखी एका भाचीची प्रकृती नाजूक आहे.

आत्या आणि भाचीच्या शरीरातील विष परीक्षणासाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात येत आहे. उन्नाव पोलिस आता विषारी पदार्थ कोणता आहे, याची माहिती घेण्याचा प्रयत्न करत आहे. एसओजीचे 10 पथकं स्थापन करण्यात आली आहेत. यासह मुलींच्या कुटुंबीय आणि गावकऱ्यांची चौकशी केली जात आहे. असे असले तरीही मुलींच्या कुटुंबियांनी सीबीआय चौकशीची मागणी केली.

काय आहे पूर्ण प्रकरण?

असोहा ठाणे परिसरात दुपारी 3 च्या सुमारास आत्या आणि भाची या प्राण्यांसाठी चारा आणण्यासाठी गेल्या होत्या. मात्र, रात्री उशिरापर्यंत परतल्याच नाही. त्यानंतर संध्याकाळी कुटुंबीय शोध घेण्यासाठी गेले होते. तेव्हा या तिघींनाही कपड्यांनी बांधलेले आढळले. यातील दोघींना मृत घोषित करण्यात आले. सध्या यातील तिसऱ्या तरुणीची प्रकृती नाजूक असून, तिच्यावर उपचार केले जात आहेत, अशी माहिती देण्यात आली आहे.