माहेश्वरी चॅरिटेबल ट्रस्टच्या विश्वस्तपदी राजेश राठी यांची 5 वर्षासाठी बिनविरोध नियुक्ती

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यातील माहेश्वरी चॅरिटेबल ट्रस्टची आज सर्वसाधारण सभा पार पडली. या सभेनंतर माहेश्वरी चॅरिटेबल ट्रस्टच्या विश्वस्त मंडळाची बिनविरोध निवड करण्यात आली. यामध्ये राजेश राठी यांची विश्वस्त म्हणून निवड करण्यात आली आहे. राजेश राठी यांची 2020 – 25 या पाच वर्षासाठी विश्वस्त म्हणून निवड करण्यात आली आहे.

राजेश राठी हे जोधपुर येथील नागणेचाय माता मंदिर चॅरिटेबल ट्रस्ट, बडा रामद्वारा सूरसागर जोधपुर चॅरिटेबल ट्रस्टचे ट्रस्टी आहेत. तसेच पुण्यातील महेश नागरी मल्टी स्टेट सोसायटीचे कार्यकारी संचालक आहेत. याशिवय पुणे आणि इतर ठिकाणी राजेश राठी हे ट्रस्टी आणि विविध पदांवर कार्यरत आहेत. त्यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर माहेश्वरी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

माहेश्वरी चॅरिटेबल ट्रस्टची सर्वसाधारण सभा संस्थेचे अध्यक्ष धनराज मालचंद राठी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजीत करण्यात आली होती. या सभेनंतर निवडणूक प्रक्रिया पार पडली. अ‍ॅड. मनोहर माहेश्वरी यानी निवडणूक प्रमुख म्हणून काम पाहिले. निवड समिती अध्यक्ष हिरालाल मालू, पुनमचंद धुत यांनी एकमताने राजेश राठी याच्यासह राजेंद्र भट्टड, सुनील सोमानी, आनंद माहेश्वरी, मंदनलाल भुतडा, घनश्याम लाहोटी, बालाप्रसाद बजाज, श्रीप्रकाश बागडी, भंवर पुंगलीया, उमेश झंवर, विजयराज मुंदडा, शाम कलंत्री, ईश्वर धूत, अशोक राठी, संतोष लढ्ढा यांची 2020-25 या पाच वर्षाकरिता बिनविरोध निवड केली. यावेळी प्रतिष्ठानचे पदाधिकारी उपस्थित होते, अशी माहिती मगराज राठी यांनी दिली.

You might also like