Unseasonal Rains In Pune | अलर्ट ! आगामी 2 दिवस पावसाचे, पुणेकरांनी घ्यावी काळजी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Unseasonal Rains In Pune | पुण्यात शनिवारी आणि आगामी 2-3 दिवस पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. दुपारी आकाश निरभ्र आणि सायंकाळनंतर विजांच्या कडकडाटासह चांगलाच पाऊस पडणार असल्याचा अंदाज आहे. सकाळी आकरा ते दुपारी 2.30 वाजेपर्यंत उनाचे चटके जाणवतील त्यामुळे घराबाहेर पडू नये, अशी सूचना देखील हवामान विभागानं (Meteorological Department) केली आहे. दरम्यान, 2 दिवसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे.

पुण्यात काल (शुक्रवारी) काही ठिकाणी किंचीत पाऊस झाला. मात्र, शनिवारी पुण्यात आणि पुणे जिल्हयात आकाशात चांगलेच ढगाळ वातावरण असून काही ठिकाणी जोरदार पाऊस पडणार असल्याचा अंदाज आहे. आगामी 7 दिवसांमध्ये पुणे शहर व परिसरात मेघगर्जना, सोसाटयाचा वारा, हलक्या स्वरूपाचा पाऊस आणि विजांचा कडकडाट होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. (Unseasonal Rains In Pune)

नागरिकांनी विजांच्या गडगडाटावेळी झाडाखाली आसरा घेऊ नये, पाऊस पडल्याने रस्त्यावर वाहने घसरतात त्यामुळे चालकांनी वाहने सावकाश चालवावीत. वीजांचा कडकडाट सुरू असताना मोबाईलचा वापर करू नये आदी सुचना देण्यात आल्या आहेत.

Web Title :-  Unseasonal Rains In Pune | next two days of rain in pune Meteorological Department

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Unseasonal Rains In Pune | काय सांगता ! होय, पुणे शहरात गारांचा पाऊस, हवामानशास्त्र विभागानं केला ‘यलो अलर्ट’ जारी

Borghat Accident News | बोरघाटात बस दरीत कोसळली ! खोपोलीतील घटनेत 8 जणांचा मृत्यु, 32 जण जखमी

Radhakrishna Vikhe-Patil | ‘आदित्य ठाकरेंचा पप्पू होऊ नये’, विखे-पाटलांच्या टीकेला ठाकरे गटाचे प्रत्युत्तर

Pune Crime News | २४ वर्षाच्या मुलावर लादली अवास्तव बंधने; आईवडिलांना सांगण्याच्या धमकीने लुबाडले अडीच लाख