IPS अपर्णा यांच्याकडून जगातील ७ वा उंच ‘माउंट डेनाली’ पर्वत ‘सर’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशातील आयपीएस अपर्णा कुमार यांनी कौतुकास्पद कामगिरी केली. अपर्णा यांनी जगातील सातवे उंच पर्वत गाठले. अमेरिकेतील माउंट डेनाली पर्वताची सफर त्यांनी पूर्ण केली. माउंट डेनाली हा अमेरिकेतील सगळ्यात उंच पर्वत आहे. या पर्वताची उंची २०३१० फूट असून तिसऱ्या प्रयत्नात त्यांना हे यश आले. शिखरावर पोहोचताच अपर्णांनी तिरंगा आणि उत्तर प्रदेश पोलिसांचा झेंडा फडकवला. आता अपर्णा यांचे पुढचे लक्ष उत्तर ध्रुवावर तिरंगा फडकवण्याचे आहे. यासाठी २०२० एप्रिल मध्ये या प्रवासासाठी त्या जाणार आहेत.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अपर्णा यांना या यशाबद्दल शुभेच्छा दिल्या. या आधी अपर्णा यांनी एशियातील माउंट एव्हरेस्ट, आफ्रिकेतील तांजानिया येथील माउंट किलिमंजारो, यूरोपातील एलब्रस, इंडोनेशिया मधील कार्सटेंस पिरामिड, अंटार्किटाकातील विनसन मैसिफ आणि दक्षिण अमेरिकेतील माउंट एंकोकागुआ या जगातील सहा पर्वताचा प्रवास पूर्ण केला होता.

माउंट डेनाली पर्वत चढण्यासाठी अपर्णा १५ जून रोजी भारतातून निघाल्या होत्या. १० जुलै पर्यंत हा प्रवास पूर्ण करण्याचा विचार त्यांच्या डोक्यात होता, पण खराब वातावरणामुळे त्यांनी हा प्रवास १० दिवसाआधीच पूर्ण केला. यादरम्यान तापमान ऊणे ४०अंश होते आणि २५० किमी प्रति तासाला बर्फ पडत होता. पण अशा परिस्थितीतही त्यांनी धैर्य सोडले नाही आणि यश संपादन केले. त्यांचे हे यश प्रत्येक महिलांसाठी प्रेरणा देणारे आहे.

व्यायाम केल्यास ‘मधुमेहात’ होऊ शकते सुधारणा

 ‘स्मरणशक्ती’ वाढविण्यासाठी हे रामबाण उपाय आवश्य करा

शाकाहारीं नो, पौष्टिकतेवर लक्ष द्या ; प्रोटिनयुक्त पदार्थ शरीराला आवश्यक

शारीरीक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी संगीत चिकित्सा ठरते उपयोगी

अहो आश्चर्यम ! ‘वजन’ कमी करण्यासाठी रात्री फक्त ‘हे’ करा

 ‘या’ व्यसनांमुळे बिघडते तुमचे ‘आरोग्य’, या व्यसनांपासून कायम राहा दूर