Urfi Javed | उर्फी जावेद पुन्हा एकदा अडकली कायद्याच्या कचाट्यात; ‘या’ व्यक्तीने दाखल केली तक्रार

पोलीसनामा ऑनलाइन : Urfi Javed | अभिनेत्री आणि मॉडेल उर्फी जावेद नेहमीच तिच्या कपड्यांमुळे चर्चेत असते. तिच्या विचित्र फॅशन सेन्सने तिला अनेकदा ट्रोल देखील करण्यात आले होते. तर आता पुन्हा एकदा तिच्या विरोधात मुंबईतील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. तिच्या विरोधात 11 डिसेंबरला एका वकिलाने तक्रार केली असल्याचा खुलासा पोलिसांनी केला आहे. उर्फी जावेद फॅशन आणि कपड्यांच्या माध्यमातून सोशल मीडियावर अश्लीलता पसरवत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. (Urfi Javed)

मुंबईतील अंधेरी पोलीस ठाण्यात वकील अली काशीद खान देशमुख यांनी लिखित स्वरूपात अर्ज देत उर्फी विरोधात तक्रार दाखल केली आहे. उर्फी नेहमीच तिच्या विचित्र कपड्यांमुळे चर्चेत असते. तर तिचे अनेक कपडे वादाचा मुद्दा ही ठरतात. त्यामुळे तिला सोशल मीडियावर ट्रोल देखील करण्यात येते. मात्र तरीही ती कोणाचाही विचार न करता प्रत्येक वेळी नवनवीन फॅशन ट्रेंड घेऊन येते. याआधी हिंदुस्थानी भाऊनेही उर्फीला शिस्तीत राहायची धमकी दिली होती. त्याला उर्फीने सडेतोड असे उत्तर देखील दिले होते. (Urfi Javed)

तर याआधी देखील उर्फी विरोधात दिल्लीच्या पोलीस ठाण्यात एका व्यक्तीने तक्रार नोंदवली होती.
समाजात अश्लीलता पसरवत असल्याचा आरोप तिच्यावर करण्यात आला होता. एवढेच नाही तर काही महिन्यांपूर्वी हाय हाय ये मजबूरी’ या गाण्यामुळे उर्फी कायदेशीर अडचणीत सापडली होती. गाण्यात रिव्हिलिंग कपडे परिधान केल्यामुळे तिला कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागले होते.

Web Title :- Urfi Javed | fir against urfi javed for wearing revelling outfits

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

IND vs BAN Test | भारताविरुद्ध कसोटी मालिकेपूर्वी बांगलादेशच्या अडचणीत वाढ ‘हा’ खेळाडू होऊ शकतो संघाबाहेर

Munmun Dutta | …म्हणून अभिनेत्री मुनमून दत्ता फोटोग्राफर्स आणि कॅमेरामॅनवर भडकली