Urfi Javed | उर्फी जावेद’ पुन्हा एकदा चर्चेत ; ‘या’ महिलेला दिले ओपन चॅलेंज

पोलीसनामा ऑनलाईन – उर्फी जावेद (Urfi Javed) ही नेहमीच तिच्या कपड्यांवरून वादाच्या भोवऱ्यात सापडत असते. तिच्या फॅशन स्टाईलवर काही लोक तिची स्तुती करतात तर काही लोक तिच्यावर टीका करतात आणि जी लोक उर्फीवर टीका करतात अशा लोकांना उर्फी (Urfi Javed) नेहमी सडेतोड उत्तर देत असते. काही दिवसांपूर्वीच करिष्मा शहाने (Karishma Shah) उर्फीवर जोरदार टीका केली होती. आता त्यानंतर शबनम शेखने ही उर्फीवर चांगलीच टीका केली आहे.

शबनम शेख (Shabnam Shaikh) ने उर्फी वर टीका करत तिच्या कपड्यांवरून तिला टार्गेट केले होते. “येणाऱ्या पिढ्यांसाठी उर्फीचे असे कपडे अत्यंत धोकादायक असल्याचे शबनमने तिच्या व्हिडिओत म्हटले आहे”. एवढेच नाही तर शबनमने उर्फीला कानाखाली मारण्याची देखील भाषा केली आहे. हा संपूर्ण व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरात व्हायरल होत आहे.

आता शबनम शेखच्या या व्हिडिओला सडेतोड उत्तर देत उर्फीने तिचाच इंस्टाग्राम स्टोरीवर हा व्हिडिओ शेअर केला
आणि शबनमवर जोरदार टीका देखील केली आहे. शबनम शेख ला उत्तर देताना उर्फी (Urfi Javed) म्हणाली,
“काही दिवसांपूर्वीच या महिलेचे मला मदतीसाठी कॉल आले. पण माझ्याकडून तिला काही मदत होऊ शकली नाही.
त्यामुळे ही माझ्यावर सतत आरोप करत असते आणि मला टार्गेट करत असते.
अशा महिले विरोधात गुन्हा नोंद करायला हवा. तसेच शबनम शेख ने उर्फीला कानाखाली मारण्याची भाषा केली त्यावेळी उर्फी म्हणाली, मी तुला ओपन चॅलेंज देते…तू फक्त माझ्या कानाखाली मारून दाखव…आता उर्फीच्या या प्रतिक्रियेवर शबनम शेख कोणते पाऊल उचलणार हे बघण्यासारखे ठरणार आहे.

Web Title :- Urfi Javed | sharing the video uorfi javed gave an open challenge

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Yash | केजीएफ स्टार यशचं वक्तव्य चर्चेत ; चाहत्यांवर केली ‘ही’ टीका

Sambhaji Raje Chhatrapati | ‘चित्रपटांतून इतिहासाची मोडतोड, असे सिनेमे काढाल तर गाठ माझ्याशी’; संभाजीराजेची आक्रमक भूमिका