Birthday SPL : 47 वर्षांची झाली उर्मिला मातोंडकर ! ‘आंटी’ म्हणणाऱ्यांना अभिनेत्रीनं दिलं चांगलंच ‘प्रत्युत्तर’

पोलिसनामा ऑनलाईन – बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेस उर्मिला मातोंडकर (Urmila Matondkar) आज तिचा 47 वा वाढदिवस साजरा करत आहे. उर्मिलाला अनेकदा लोक आंटी म्हणून ट्रोल करतात. परंतु याचा तिच्यावर काही परिणाम होत नाही असं तिचं म्हणणं आहे. उर्मिला सांगते, तुम्ही जर मला या माध्यमातून त्रास देणार असाल तर मी सांगते की, मला यानं अजिबात त्रास होत नाही.

उर्मिला म्हणते, मी कोणावर टीका किंवा जजमेंट देत नाही. मी प्रामाणिकपणे सांगते की, मी जीवनात नेहमीच जे काम माझ्यासमोर आलं ते शिकण्यचा प्रयत्न केला आहे.

उर्मिला सांगते की, माझ संगोपन असं झालंय की, वाढदिवसासारख्या गोष्टींमुळं मी जास्त उत्साही होत नाही. आज वाढदिवसानिमित्त तिनं गरिबांना गरजेच्या वस्तूंचं वाटप करण्याची योजना आखली आहे. फेसबुक आणि इंस्टा लाईव्ह करत ती चाहत्यांशी कनेक्ट होणार आहे.

उर्मिला म्हणाली, वाढदिवशी दान करण्याची परंपरा आधीपासून चालत आली आहे. बालपणापासून समाजासाठी काहीतरी करण्याची भावना मनात राहिली आहे. बाबा आमटे यांच्या आनंदवन सारख्या संस्थांना आम्ही डोनेट करतो. आपल्यापेक्षा त्या लोकांना याची जास्त गरज आहे असंही ती आवर्जून सांगते.