चर्चेत उर्वशी रौतेलाचा बॅकलेस ड्रेस, किंमत 32 लाख, बनवण्यासाठी लागले 150 तास

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  उर्वशी रौतेला चित्रपटांसह आपल्या फोटोजसाठी सुद्धा चर्चेत असते. प्रत्येक फोटोतील अतिशय सुंदर आउटफिट्स तिच्या सौंदर्यात अधिकच भर घालतात. पुन्हा एकदा उर्वशीचा रेड आउटफिट आपली किंमत आणि तो बनवण्यासाठी लागलेल्या वेळ यामुळे चर्चेत आहे.

उर्वशी रौतेलाने नुकतेच रेड आउटफिटमध्ये आपले फोटोज शेयर केले होते. यामध्ये अ‍ॅक्ट्रेसने जो आउटफिट घातला आहे त्यामध्ये उर्वशी अतिशय सुंदर दिसत आहे. हा आउटफिट Filipino designer Michael Cinco ने डिझाइन केला आहे.

या रेड आउटफिटची किंमत 45 हजार अमेरिकन डॉलर, भारतीय चलनात 32,88,427.10 रूपये आहे. हा महागडा आउटफिट बनवण्यासाठी मोठी मेहनत घ्यावी लागली आहे. तो बनवण्यासाठी 150 तास म्हणजे जवळपास 6 दिवसांचा वेळ लागला आहे.

डिझायनरने हा आउटफिट बनवण्याच्या प्रक्रियेचा खुलासा केला आहे. एका इंटरव्ह्यूमध्ये डिझायनर Michael Cinco ने सांगितले – न्यू ईयर इव्हेंटला स्टार उर्वशी रौतेलाने हा रेड ड्रेस घातल्याने आनंद झाला. हा बॅकलेस फेयरी गाऊन तिला रेड फेयरी लुक देत आहे.

त्याने पुढे ड्रेस मटेरियल आणि तो बनवण्यासाठी लागलेल्या वेळेबाबत चर्चा केली. त्याने म्हटले- या इंडियन इंट्रीकेट पॅटर्नने प्रेरित ड्रेसमध्ये बीडेड tulle चा वापर केला आहे. हा 45000 डॉलरच्या किमतीचा ड्रेस बनवण्यासाठी 150 तास लागले. हा ड्रेस तिच्या ग्रेसफुल पर्सनालिटीवर एकदम फिट बसला आहे.

Michael Cinco ने ऐश्वर्या राय बच्चनसाठी सुद्धा ड्रेस डिझाईन केले आहे. त्याने ऐश्वर्याचा कान्स ड्रेस डिझाईन केला होता.