Video : ‘खइके पान बनारस वाला’ म्हणत उर्वशीनं अनोख्या अंदाजात खाल्लं पान ! ‘बिग बी’ अमिताभला म्हणते…

पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूडमधील हॉट अ‍ॅक्ट्रेसपैकी एक उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) सोशल मीडियावर सुपर अ‍ॅक्टिव्ह असते. गेल्या काही दिवसांपासून तिचे हॉट फोटो आणि व्हिडिओ अटेंशन घेत आहेत. ती कायमच बिकिनीत दिसत असते. अनेकदा आपल्या फॅशनमुळंही उर्वशी चर्चेत असते. उर्वशीचा एक व्हिडिओ समोर आला आहे, जो सध्या अटेंशन घेताना दिसत आहे.

उर्वशीनं तिच्या इंस्टावरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात ती अनोख्या अंदाजात बनारसी पान खाताना दिसत आहे. सामान्यपणे मुली अशा अंदाजात पान खात नाहीत. त्यामुळं तिला पाहणारे अनेकजण पाहतच राहिले.

https://www.instagram.com/p/CIdI0VGhPjc/

उर्वशीनं या पोस्टमध्ये बिग बी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनाही टॅग केलं आहे आणि पान खाणार का असं म्हणत पान ऑफर केलं आहे. व्हिडिओत तिच्या हातात प्लेटमध्ये अनेक पान दिसत आहेत. खइके पान बनारस वाला असंही ती म्हणत आहे.

उर्वशीचा हा अंदाजही चाहत्यांना खूप आवडला आहे. सध्या तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. अनेकांनी यावर कमेंट करत प्रतिक्रियादेखील दिल्या आहेत.

उर्वशीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं, तर काही दिवसांपूर्वीच ती व्हर्जिन भानुप्रिया या सिनेमात दिसली. याशिवाय तिनं एक डायमंड दा हार लेदे यार या म्युझिक व्हिडिओत आणि पागलपंती सिनेमातही काम केलं आहे. असंही बोललं जात आहे की, ती कार्तिक आर्यनच्या भूल भुलैया 2 या सिनेमात दिसणार आहे. सिंह साहब दी ग्रेट या सिनेमातून तिनं सनी देओलसोबत बॉलिवूड डेब्यू केला होता.