अमेरिकेत पहिली कोरोना लस दिली नर्सला, ट्रम्प यांनी दिल्या ट्विटरवर शुभेच्छा

वॉशिंग्टन : अमेरिकेत सोमवारी कोरोना व्हॅक्सीनचा पहिला डोस देण्यात आला आहे. व्हॅक्सीनचा पहिला डोस न्यूयॉर्कची एक नर्स सँड्रा लिंडसे यांना देण्यात आला. कोरोना लसीकरणाचा हा कार्यक्रम टीव्हीवर लाइव्ह सुद्धा दाखवण्यात आला. कोरोनाची व्हॅक्सीन घेतल्यानंतर नर्सने म्हटले, मला आज खुप आश्वस्त आणि दिलासादायक वाटत आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सुद्धा ट्विट करून आपला आनंद व्यक्त केला. त्यांनी म्हटले की, कोरोना व्हॅक्सीनचा पहिला डोस देण्यात आला आहे.

ट्रम्प यांनी आपल्या ट्विटर हँडलवर लिहिले की, अमेरिका शुभेच्छा. पहिल्या व्हॅक्सीनचा डोस देण्यात आला आहे. संपूर्ण जगाला शुभेच्छा.

 

 

 

 

 

 

 

 

 

बुधवारी कोरोना व्हायरसने विक्रमी 3263 लोकांचा मृत्यू झाल्यानंतर अमेरिकन प्रशासनाने तत्काळ हालचाली सुरू केल्या आणि फायजर आणि बायोएनटेकच्या कोविड-19 व्हॅक्सीनला आपत्कालीन वापरासाठी मंजूरी दिली. अमेरिका रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्राच्या लसीकरणाशी संबंधित समितीने शनिवारी 16 वर्ष आणि त्यापेक्षा जास्त वयाच्या लोकांना लस देण्याच्या बाजूने मतदान केले.

अमेरिकेची औषध उत्पादक कंपनी फायजरने बहुप्रतिक्षित कोविड-19 च्या लसीची पहिली बॅच मिशिगन गोडाऊनमध्ये रवाना केली आहे. अमेरिकेत या लसीला नुकतीच मंजूरी दिली आणि अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मोठ्या लसीकरण अभियानाला सुरूवात झाली.

मिशिगन येथील फायजरच्या उत्पादन विभागातून कोविड-19 लसीची पहिली बॅच ट्रकमध्ये भरून रवाना करण्यात आली. ही बॅच अगोदर ठरल्याप्रमाणे 636 ठिकाणी पोहचवली जाईल. अमेरिका अन्न आणि औषध प्रशासनाने (एफडीए) या लसीला आपत्कालीन वापरासाठी शुक्रवारी मंजूरी दिली होती.

अमेरिकेत कोविड-19 ची ही लस अशावेळी उपलब्ध झाली आहे, जेव्हा संसर्गामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल लोकांची संख्या सर्वाधिक आहे. आता हिवाळी सुट्टी सुरू होणार आहे आणि अशावेळी तज्ज्ञांनी सावध केले आहे की, मोठ्या लोकसंख्येला लस देण्यापूर्वी स्थिती खराबच राहण्याची शक्यता आहे.