Coronavirus Updates : अमेरिकेत कोरोना व्हायरसचा महास्फोट, एका दिवसात पहिल्यांदाच 1 लाखांपेक्षात जास्त संक्रमित

वॉशिंग्टन : अमेरिकेत जारी राष्ट्राध्यक्ष निवडणुकीच्या रणधुमाळीत कोरोना व्हायरसचा महास्फोट समोर आला आहे. येथे पहिल्यांदाच कोरोना संक्रमितांचा आकडा एक दिवसात 1 लाखाच्या पुढे गेला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सायंकाळपर्यंत, अमेरिकेत 104,000 पेक्षा जास्त नवीन प्रकरणे नोंदली गेली आहेत. शिवाय हॉस्पीटलमध्ये भरती होणार्‍या आणि गंभीर रूग्णांच्या संख्येत सुद्धा वाढ झाली आहे.

मंगळवारी अमेरिकन जनतेने राष्ट्राध्यक्ष पदासाठी मतदान केले आहे. या दरम्यान मोठ्या संख्येने लोक फेस मास्क, गॉगल आणि फेस शील्ड घालून मतदान करताना दिसले. तर कोरोना संकट पहाता मोठ्या संख्येने मतदारांनी पोस्टल बॅलेटचा वापर केला. मात्र, तज्ज्ञांनी निवडणुकीदरम्यान कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भिती व्यक्त केली होती. अमेरिकेच्या 17 राज्यांत – ज्यामध्ये कॅनसस, टेनेसी, व्हर्जीनिया, ओक्लाहोमा, मोंटाना, आयोवा, नॉर्थ डकोटा, साऊथ डकोटा, ओहियो, नेब्रास्का, मिनेसोटा, इंडियाना आणि वेस्ट व्हर्जीनियाचा समावेश आहे. येथे रूग्णांच्या संख्येत वेगाने वाढ होत आहे.

युरोपात सुद्धा वाढले संकट
युरोपात कोरोना महामारीची दुसरी लाट वाढत चालली आहे. यास तोंड देण्यासाठी अनेक युरोपीय देशांनी कडक पावले उचलली आहेत. याच प्रयत्नांमध्ये जर्मनीमध्ये आंशिक लॉकडाऊन सोमवारपासून चार आठवड्यांसाठी लागू केले आहे. नव्या प्रतिबंधांमध्ये रेस्टॉरंट, बार आणि सिनेमा हॉल शेवटपर्यंत बंद राहतील. तर फ्रान्समध्ये महामारी वेगाने वाढत आहे. या देशात अगोदरच एक डिसेंबरपर्यंत लॉकडाऊन लावण्यात आले आहे. या दोन्ही युरोपीय देशांमध्ये रोज विक्रमी संख्येमध्ये नवी प्रकरणे सापडत आहेत.