अमेरिकेची मोठी घोषणा ! चीनसोबत युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यास भारताला साथ देणार

वॉशिंग्टन : व्हाइट हाऊसच्या प्रमुख अधिकार्‍याने सोमवारी घोषणा केली की, जर भारत आणि चीनमध्ये युद्धाची स्थिती निर्माण झाली तर हे स्पष्ट आहे की अमेरिकन सैन्य भारताला साथ देईल. व्हाइट हाऊसने स्पष्ट म्हटले की, ते चीनला आशियामध्ये दादागिरी करू देणार नाहीत. व्हाइट हाऊसच्या या घोषणेनंतर काही वेळातच अमेरिकन राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट केले की, चीनमुळे अमेरिका आणि अन्य जगाला मोठे नुकसान पोहचले आहे.

व्हाइट हाऊसचे चीफ ऑफ स्टाफ मार्क मीडोज यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात ’फॉक्स न्यूज’ला सांगितले की, संदेश स्पष्ट आहे. आम्ही उभे राहून चीनला किंवा अन्य कुणाला सर्वात शक्तीशाली किंवा प्रभावी शक्ती होण्याच्या बाबतीत सूत्र हातात देऊ शकत नाही. मग त्या क्षेत्रात आम्ही असो किंवा नसो. अमेरिकन नौदलाद्वारे क्षेत्रात आपली उपस्थिती वाढवण्यासाठी दक्षिण चीन समुद्रात दोन विमान वाहत युद्धनौका तैनात केल्यानंतर अधिकार्‍याचे हे वक्तव्य आले आहे.

तर ट्रम्प यांनी पुन्हा ट्विट केले की, चीनमुळे अमेरिका आणि अन्य जगाचे मोठे नुकसान झाले आहे. कोरोना व्हायरस महामारीमुळे अमेरिका, संपूर्ण यूरोप आणि भारतासह जगातील अन्य देशांची अर्थव्यवस्था जवळपास ठप्प झाल्यासारखी झाली आहे. त्यांनी प्रश्न विचारला की, चीनने कोविड-19 च्या बाबतीत सुरूवातीच्या काळातच माहिती का दिली नाही, आणि संपूर्ण जगात व्हायरसचा प्रसार का होऊ दिला?

सुरक्षेच्या दृष्टीने साऊथ चायना समुद्रात अमेरिकन सैन्य
मीडोजने यांनी म्हटले की, अमेरिकेने दक्षिण चीन समुद्रात आपल्या दोन विमानवाहू युद्धनौका पाठवल्या आहेत. आमच्याकडे अजूनही जगातील सर्वश्रेष्ठ शक्ती आहे, हे जगाला समजावे हा आमचा हेतू आहे. चीन, दक्षिण चीन समुद्र आणि पूर्व चीन समुद्र क्षेत्र वादात अडकलेला आहे. चीन जवळपास सर्वच दक्षिण चीन समुद्रावर दावा करत आहे. व्हिएतनाम, फिलिपिन्स, मलेशिया, ब्रुनेई आणि तैवानच्या क्षेत्राबाबतही त्यांचा दावा आहे. मीडोज यांनी मुलाखतीदरम्यान भारतान चीनी अ‍ॅप्स बंद करण्याचा घेतलेला निर्णय चांगला असल्याचे म्हटले.

भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये पँगोंग, गलवान खोरे आणि गोग्रा हॉट स्प्रिंग सह पूर्व लडाखच्या अनेक भागात आठ आठवड्यांपासून वाद सुरू आहे. मात्र, स्थिती तेव्हा बिघडली जेव्हा 15 जूनरोजी गलवान खोर्‍यात दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये हिंसक संघर्ष झाला आणि भारताचे तब्बल 20 जवान शहीद झाले.

चीनी सैन्याने गलवान खोर्‍यात आणि गोग्रा हॉट स्प्रिंगमधून सोमवारी आपले सैन्य मागे घेण्यास सुरूवात केली आहे. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजीत डोभाल आणि चीनी परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी रविवारी टेलीफोनवर चर्चा केली, ज्यामध्ये एलएसीपासून सैनिक वेगाने मागे घेण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यावर सहमती झाली.