स्कुटर मेकॅनिकवर अमेरिकन मुलगी ‘फिदा’, भारतात येऊन केलं ‘लग्न’ !

अमृतसर : वृत्तसंस्था – लग्नाच्या गाठी देवच बांधतो असे म्हटले जाते. कधी आणि कोणाबरोबर लग्न होईल हे कोणालाही सांगता येत नाही. अशी एक घटना अमृतसरमध्ये घडली आहे. अमेरिकेत राहणाऱ्या मुलीची आणि अमृतसर येथील स्कुटर मेकॅनिकची सात महिन्यांपूर्वी फेसबुकवर मैत्री झाली. मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले आणि अमेरिकेत राहणाऱ्या मुलीने भारतात येऊन त्याच्यासोबत लग्न करून संसार थाटला.
USA-Girl
दोघांची फेसबुकवर मैत्री झाल्यानंतर दोघांनी एकमेकांना आपल्या नंबरची देवाण घेवाण केली. त्यानंतर त्यांच्यामध्ये बोलणे सुरु झाले. यातूनच त्यांच्यामध्ये एकमेकांवर प्रेम जडले. अमेरिकेत राहणारी एमिली या मुलीने भारतात येऊन अमृसरमध्ये राहणाऱ्या पवन कुमारसोबत लग्न केले. पवनच्या म्हणण्यानुसार त्याला फेसबुकवर फ्रेंन्ड रिक्वेस्ट आली होती. ती त्याने स्विकारली आणि त्यानंतर दोघांमध्ये प्रेम झाले.

सात महिने दोघांमध्ये बातचित होत होती. अखेर पवन कुमार याने एमिला प्रपोज केले. मात्र, अमेरिकेत जाणासाठी पैसे नसल्याचे त्याने तिला सांगितले. अखेर एमिलीने भारतात येण्याचा निर्णय घेतला. तिने भारतात येऊन पवन कुमार सोबत हिंदू पद्धतीने पवन कुमार सोबत लग्न केले. एका परदेशी मुलीसोबत लग्न झाल्याने पवन कुमार खूप आनंदी आहे. तसेच एमिली देखील त्याच्याशी लग्न झाल्याने खूष आहे.
pawan-kumar-family
एक फॉरेनची मुलगी सून म्हणून मिळाल्याने पवनची आई खूष आहे. मात्र, सुनेला आपली भाषा समजत नसल्याने त्यांच्यात संवाद होताना अडचणी येत आहेत. तिला आमची भाषा समजत नाही आणि तिची भाषा आम्हाला समजत नाही. परंतु ती आमची भाषा हळूहळू शिकत असल्याचे पवनच्या आईने सांगितले. हेच मत पवनचे वडील शेरचंद यांचे देखील आहे. मुलगा खूष तर आम्ही खूष असे त्यांनी सांगितले.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like