उषा वाजपेयी यांना ‘कोरोना सेवा सन्मान’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –  भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय महिला मोर्चा स्वयंसेवी संस्था विभागाच्या राष्ट्रीय संयोजिका उषा वाजपेयी(पुणे) यांना कोरोना काळातील अन्नधान्य वितरण सेवेबद्दल ‘कोरोना सेवा सन्मान’ देऊन गौरविण्यात आले.

डॉ. हरीश शेट्टी यांनी आयोजित केलेल्या ‘कोविड टॉक्स’ या उपक्रमात हा सन्मान करण्यात आला. कोविड विषाणू साथीच्या काळात उषा वाजपेयी यांनी देशभर गरजू कुटुंबियांना अन्न धान्य वितरण आणि थेट आर्थिक मदत केली. उषा वाजपेयी ३० वर्षांपासून महिला सक्षमीकरणाचे काम करीत आहेत. कलाकारांना प्रोत्साहन,महिलाना रोजगार,महिलांना सरकारी योजनांतून अर्थपुरवठा होण्यासाठी मार्गदर्शन अशा उपक्रमातून त्या कार्यरत आहेत .