2-3 आठवड्यापर्यंत एकच मास्क वापरल्यास होऊ शकतो ब्लॅक फंगस AIIMS डॉक्टर

नवी दिल्ली : देश कोरोना व्हायरसचा सामना करत असतानाच आता ब्लॅक फंगसचे संकट वाढू लागले आहे. हा आजार वेगाने पसरू लागला आहे. ही महामारी पसरण्याचे एक आश्चर्यकारक कारण समोर आले आहे. एम्सच्या डॉक्टरांनुसार, एकच मास्क सतत दोन ते तीन आठवडे वापरल्याने तो ब्लॅक फंगसचे कारण ठरू शकतो.

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) दिल्लीच्या न्यूरोसर्जरी विभागाचे प्रोफेसर डॉ. पी. शरत चंद्र यांनी ब्लॅक फंगसबाबत बोलताना म्हटले की, सतत 2-3 आठवडे एकच मास्क घालणे ब्लॅक फंगसच्या विकासाचे कारण ठरू शकते.

ब्लॅक फंगस होण्याची अनेक कारणे
डॉ. शरत चंद्र यांनी म्हटले, फंगल इन्फेक्शन काही नवीन प्रकार नाही. परंतु हे कधीही आपल्या चेहर्‍यावर झाले नाही. आपल्याला आजूनही याचे योग्य कारण समजत नाही की, हे महामारीचे रूप का धारण करत आहे. परंतु याच्या पाठीमागे अनेक कारणे आहेत असे आपण म्हणून शकतो.

डॉ. शरत चंद्र यांच्यानुसार याच्या प्रमुख कारणांमध्ये अनियंत्रित डायबिटीज, टोसीलिजुमाबसह स्टेरॉईडचा वापर, रूग्ण व्हेंटिलेटरवर असणे, ऑक्सीजन घेणे याचा समावेश आहे. कोविड उपचाराच्या 6 आठवड्याच्या आत जर कुणी या पैकी कशातून गेला असेल तर त्यास ब्लॅक फंगस होण्याचा धोका सर्वात जास्त आहे.

एम्सच्या डॉक्टरांनी पुढे म्हटले, ऑक्सीजन सिलिंडरमधून थेट थंड ऑक्सीजन देणे खुपच धोकादायक आहे. तसेच एक मास्क सतत 2-3 दिवस वापरणे ब्लॅक फंगस वाढण्याचे कारण ठरू शकते. ब्लॅक फंगसच्या घटना कमी करण्यासाठी याच्या अति धोक्याच्या आवाक्यात आलेल्या संभाव्य लोकांना पोसाकोनाझोल औषध दिले जाऊ शकते.