आंबेडकरांच्या नावामागे ‘महाराज’ जोडल्यामुळे कार्यवाहक रजिस्ट्रारचं निलंबन

औरंगाबाद: पोलीसनामा आॅनलाईन

डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या एका कार्यवाहक रजिस्ट्रारने आंबेडकरांच्या नावामागे महाराज हा शब्द जोडल्याने त्याचे निलंबन करण्यात आलं आहे. साधना पांडे असे या रजिस्ट्रारचे नाव आहे. सदरची घटना लक्षात येताच सिनेटच्या बैठकीत सदस्यांनी जोरात हंगामा केला. यावेळी ही कारवाई करण्यात आली आहे.

याबाबत सविस्तर असे की, सिनेट सदस्यांची बैठक बोलावण्यात आली होती. यावेळी पत्रकारही उपस्थित होते. या बैठकीला संबोधित करताना पांडे यांनी आंबेडकरांच्या नावामागे ‘महाराज’ शब्द जोडला. त्यामुळे बैठकीला उपस्थित असलेल्या सिनेट सदस्यांचा पारा चढला आणि त्यांनी बैठकीत प्रचंड गोंधळ घातला. पांडे यांनी हेतूपुरस्सर आंबेडकरांच्या नावामागे ‘महाराज’ हा शब्द जोडला असून त्या उजव्या विचारसरणीच्या असल्यामुळेच त्यांनी हे कृत्य केले. त्यामुळे त्यांचे तात्काळ निलंबन करण्यात यावे, अशी मागणी सिनेट सदस्यांनी लावून धरली. त्यामुळे कुलगुरू बी. चोपडे यांनी अखेर पांडे यांना निलंबित केले.