‘सपा-बसपा’ मध्ये झालेल्या ‘फारकती’वर जयाप्रदा म्हणतात…

लखनऊ : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशात नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मायावती यांच्या बहुजन समाजवादी पार्टी आणि अखिलेश यादव यांच्या समाजवादी पार्टी यांनी आघाडी करत निवडणूक लढवली होती. मात्र लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर आज दिल्लीत पार पडलेल्या चिंतन बैठकीत मायावती यांनी महाआघाडीचा उत्तर प्रदेशात काही फायदा झाला नाही. यादवांचे मतदान बसपाला मिळाले नाही, असे सांगत उत्तर प्रदेशात ११ ठिकाणी होणाऱ्या विधानसभा निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा केली. त्यावर आता भाजप नेत्या जया प्रद यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

यावर बोलताना त्या म्हणाल्या कि, जर हि युती आगोदरच तुटली असती तर रामपूरच्या जागेवर भाजपचा विजय निश्चित झाला असता. स्वार्थासाठी करण्यात आलेली हि युती तुटणारच होती. यावेळी त्यांनी समाजवादी पार्टीचे नेते आजम खान यांच्यावर देखील टीका केली. पत्रकारांनी त्यांना मंत्रिपदाविषयी विचारले असता त्या म्हणाल्या कि, यावर पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील. त्यांनी माझ्यावर जी जबाबदारी दिली आहे, ती मी प्रामाणिकपणे पार पडण्याचा प्रयत्न करत आहे. पुढे बोलताना त्या म्हणाल्या कि समाजवादी पक्षात असताना देखील मी जनतेची सेवा करण्याचाच विचार करत होते, आणि भाजपमध्ये देखील मी तो विचार करूनच प्रवेश केलेला आहे.

दरम्यान, महाआघाडीवर टीका करताना त्यांनी मायावती आणि अखिलेश यांच्यावर गंभीर आरोप केले. मायावती यांना पंतप्रधान पदाची आस आहे तर अखिलेश यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हायचे आहे, त्यामुळे स्वतःच्या स्वार्थासाठी हि युती झाली होती. यामध्ये जनतेचा काहीही फायदा नव्हता. जर आगोदरच हे पक्ष वेगवेगळे लढले असते तर रामपूरमध्ये माझा विजय नक्कीच झाला असता. लोकसभा निवडणूक निकालामुळे नाराज झालेल्या मायावतींनी येत्या विधानसभा निवडणुकीत स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे.