मोदी सरकारचं आणखी एक मोठं गिफ्ट, आता ‘वंदे भारत’ ट्रेनने करा वैष्णव देवीचे दर्शन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मोदी सरकारने वैष्णव देवीचे दर्शन घेऊ इच्छिणाऱ्या भक्तांना एक मोठे गिफ्ट दिले आहे. त्यासाठी आता वंदे भारत ही रेल्वे धावेल. त्याची सोय मोदी सरकार भाविकांना करुन देणार आहे. यासाठी दिल्लीवरुन कटरा पर्यंत ही रेल्वे चालवण्यात येईल. ही रेल्वे ८ तासात आपले अंतर कापेल. जे की सामान्या रेल्वेला पार करण्यास ११ ते १२ तास लागतात. म्हणजेच प्रवाशांची ४ तासाची बचत होईल. टी -१८ या नावाने प्रसिद्ध वंदे भारत ची ट्रायल लवकरच या मार्गावर चालवण्यात येतील. भारतीय रेल्वेने यासाठी पुर्ण तयारी केली आहे.

कटरा वरुन परतीच्या प्रवासात वंदे भारत दुपारी ३ वाजता कटरा स्टेशनला नवी दिल्लीसाठी निघेल. आणि रात्री ११ वाजता नवी दिल्ली स्टेशन पोहचेल. याच दरम्यान रेल्वे ४.१८ वाजता जम्मू तवी स्टेशन आणि सायंकाळी ७.३८ वाजता लुधियाना, आणि रात्री २०.५६ वाजता अंबाला स्टेशनला पोहचेल.

रेल्वे मंत्रालयाने दिल्ली ते कटरा या मार्गावर वंदे भारत रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला आहे. नॉर्थन रेल्वे प्रबंध निर्देशक देखील जम्मू कटरा रेल्वे सेक्शनचे निरिक्षण करण्यासाठी जाणार आहे. तर जबेराल मॅनेजर टीपी सिंह अम्बाला पासून कटरा पर्यंत रेल्वे सेक्शनचे निरिक्षण करुन पाहतील की, वंदे भारत रेल्वे १३० किमी प्रतितास वेगाने चालवली जाऊ शकते की नाही?

सुंदर आणि ग्लोइंग त्वचा हवीये.. ‘या’ टिप्स वापरून घरी पण घेऊ शकता स्पा

वजन कमी करण्यासाठी खा ‘ही’ फळभाजी

पोटाच्या समस्या कधीच होणार नाहीत, जर सांभाळल्या ‘या’ आठ गोष्टी

ऑफिसमध्ये बसूनही करता येतील व्यायामाचे हे प्रकार