Vanita Kharat Wedding | सुमितने वनिता खरातसाठी घेतला खास उखाणा; म्हणाला “तू दिसतेस फार सुंदर साडीवर…”

पोलीसनामा ऑनलाईन : अभिनेत्री वनिता खरात (Vanita Kharat Wedding) हि ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’या कार्यक्रमातून घराघरात जाऊन पोहचली. वनिता खरात आणि सुमित लोंढे यांच्या लग्नाच्या चर्चा काही दिवसापासून चालू होत्या. अखेर २ फेब्रुवारीला सुमित आणि वनिता लग्नबंधनात (Vanita Kharat Wedding) अडकले. वनिताने तिचा प्रियकर सुमित लोंढेबरोबर सप्तपदीं घेत, नातेवाईक व मित्रपरिवाराच्या आशीर्वादाने तिच्या नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे.

Advt.

वनिताच्या लग्नाचे विविध फोटो आणि व्हिडीओ सध्या व्हायरल होताना दिसत आहे. वनिता आणि सुमित यांच्या मेहंदी-हळदीचे फोटो समोर येण्यापूर्वी त्यांचे प्रीवेडिंग शूट चर्चेत आले होते. यामध्ये पहिल्यांदाच वनिताचा रोमँटिक अंदाज पाहायला मिळाला. या फोटोशूटमध्ये सर्वाधिक चर्चा झाली ते सुमित-वनिताच्या (Vanita Kharat Wedding) लिपलॉक फोटोची आणि त्यावर अभिनेत्रीने दिलेलं मराठी कॅप्शनची. त्यांच्या मेहंदी आणि हळदी सोहळ्यातील फोटोही व्हायरल झाले होते. तिने तिच्या लग्नासाठी पांढऱ्या रंगाची नऊवारी साडी, डिझायनर ब्लाऊज आणि पैठणी शेला असा मराठमोळा लूक केला होता. त्याबरोबर तिने पारंपरिक दागिनेही परिधान केले होते.तर सुमितने शेरवानी आणि फेटा बांधत शाही लूक केला होता. त्यानंतर या दोघांनी रिसेप्शनला साडी आणि ब्लेझर असा वेस्टर्न लूक केला होता. यावेळी वनिताने जांभळ्या रंगाची साडी परिधान केली होती. तर सुमीत हा निळ्या रंगाच्या सूट-बुटात पाहायला मिळाला.

सध्या सुमित लोंढेने वनितासाठी घेतलेल्या उखाण्याचा व्हिडीओ सध्या वायरल होत आहे.
यावेळी सुमित लोंढेने वनितासाठी खास उखाणा घेतला. “तू दिसतेस फार सुंदर साडीवर, इथून पुढे तुला फिरवणार आहे माझ्या गाडीवर”, असा उखाणा सुमितने वनितसााठी घेतला. त्याचा हा उखाणा ऐकून वनिताने अग्गबाई असं म्हटलं. वनिताच्या नवऱ्याविषयी सांगायचं झालं तर तो एक व्हिडिओ क्रिएटर आणि ब्लॉगर आहे. सोशल मीडियावर तो विशेष सक्रिय असून वनितासोबतही त्याचे अनेक फोटो इन्स्टाग्रामवर आहेत.

Web Title :-  Vanita Kharat Wedding | maharashtrachi hasyajatra fame vanita kharat husband sumit londhe special ukhana see video

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Nashik Crime News | नाशिकमध्ये भर रस्त्यात तरुणींमध्ये फ्री स्टाईल हाणामारी (व्हिडिओ)

Kolhapur News | ट्रक उलटला अन ग्रामस्थांची गर्दी झाली; ‘मदती’ला नव्हे ‘लुटालुटी’ला

Nagpur Crime News | नागपूरमध्ये तलवार गॅंगची दहशत; भर बाजारात केली तोडफोड