Varun Dhawan | शुटिंगदरम्यान वरुण धवनने एक महिना जान्हवीसोबत साधला नाही कोणताही संवाद

पोलीसनामा ऑमलाइन – अभिनेत्री जान्हवी कपूर व अभिनेता वरुण धवन (Varun Dhawan) यांचा लवकरच ‘बवाल’ चित्रपट (Bawal Movie) प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून लवकरच हा सिनेमा ओटीटीवर रिलीज करण्यात येणार आहे. वरुण आणि जान्हवी (Varun Dhawan And Janhvi) पहिल्यांदा एकत्र स्क्रीन शेअर करत असल्यामुळे त्या दोघांचे चाहते चित्रपटासाठी उत्साहित आहेत. ‘बवाल’ चित्रपटातील ‘तुम्हे कितना प्यार करते’ (Tumhe Kitna Pyaar Karte) हे गाणे देखील प्रेक्षकांना आवडले आहे. दोघे चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करत आहेत. या दरम्यान वरुणने हे सांगितले आहे की शुटिंग दरम्यान तो जान्हवीसोबत (Varun Dhawan And Janhvi) एक महिना बोलत नव्हता.

 

 

 

अभिनेता वरुण धवन सध्या ‘बवाल’ चित्रपटाचे प्रमोशन करताना दिसत आहे. या दरम्यान त्याने एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये चित्रपटाच्या शुटिंगचे अनेक किस्से शेअर केले आहेत. यामध्ये वरुण धवनने खुलासा केला की तो सुरुवातीला 1 महिना अभिनेत्री जान्हवी कपूरसोबत (Janhvi Kapoor) काहीच बोलत नव्हता. त्याने सांगितले की स्क्रीनवर काही वेगळेच दिसू नये म्हणून मी तिच्यासोबत बोलत नव्हतो. तो म्हणाला की, “एक महिना आम्ही सगळे रोज सेटवर यायचो. सगळे शुटिंगमध्ये व्यस्त असायचे पण मी प्रयत्न करायचो की जान्हवीशी एक शब्द देखील बोलायला नको. मला असे वाटत होते की आम्ही खूप लवकर मित्र झालो असतो. मी म्हणालो की मला असे नाही करायचे मला थोडे वेगळे राहू द्या” अभिनेता वरुण धवनच्या या बोलण्याने सर्वांना आश्चर्याचा धक्काच बसला.

 

 

 

वरुणने पुढे सांगितले की, मी सेटवर सगळ्यांशी बोलायचो आणि मुद्दाम जान्हवीशी बोलत नव्हतो.
मला वाटले की जेव्हा आम्ही नेचर सीन करत होतो तेव्हा माझ्यात आणि तिच्यामध्ये काहीतरी वेगळे होईल.
नितेश सरांच्या हे लक्षात आले. आणि 20 दिवसांनंतर मी त्यांना हे सांगितले आणि मग त्यांना समजले.
नाहीतर जान्हवीने हे पर्सनली घेतले असते. नंतर वरुणने जान्हवीला समजावले आणि सांगितले की
“बघ, मी हे जाणूनबुजून केले होते. पण याचा त्या वेळी आम्हा दोघांना फायदा झाला.
खरंतर चित्रपटात देखील हे जोडपे हळूहळू एकमेकांना ओळखू लागतात आणि आम्हीही एकमेकांना हळूहळू ओळखू लागलो, जे मज्जेशीर आहे.”

 

 

अभिनेता वरुण धवन व अभिनेत्री जान्हवी कपूर (Varun Dhawan And Janhvi)
हे पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहेत. त्याचा हा ‘बवाल’ चित्रपट येत्या 21 जुलैला ओटीटी वर प्रदर्शित होणार आहे.
(Bawal Movie Release Date) बवाल चित्रपटाचे दिग्दर्शक नितेश तिवारी
(Director Nitesh Tiwari) यांनी केले असून चित्रपटाचे निर्माते साजिद नाडियाडवाला
(Producer Sajid Nadiadwala) आहे. या आधी साजिद यांच्या या चित्रपटांमध्ये वरुण धवनने
भूमिका साकारल्या आहेत. आता वरुण व जान्हवीची ढिशूम
(Dishoom) व जुडवा 2 (Judwa 2) ऑन स्क्रीन कैमिस्ट्री पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

 

Web Title : Varun Dhawan | bawaal varun dhawan reveals he did not speak to janhvi kapoor in first month of movie shoot

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा