BJP Mahavijay Workshop | शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटासोबत जुळवून घ्या, भाजपच्या महाविजय कार्यशाळेत पदाधिकाऱ्यांना आवाहन

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – BJP Mahavijay Workshop | आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपने तयारी सुरु केली आहे. आज भिवंडी येथील महाविजय कार्यशाळेत भाजपकडून ‘मोठं कुटुंब, सुखी कुटुंब’चा नारा देण्यात आला. भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार (BJP Mumbai President Ashish Shelar) यांनी ही घोषणा केली आहे. स्थानिक पातळीवर शिवसेना शिंदे गट (Shiv Sena Shinde Group) आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटासोबत (NCP Ajit Pawar Group) जुळवून घेण्याचे आवाहनही महाविजय कार्यशाळेत (BJP Mahavijay Workshop) करण्यात आले.

 

आशिष शेलार यांनी यावेळी सोनिया गांधी (Sonia Gandhi) आणि शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर टीकेचे प्रहार केले. सोनिया गांधी यांना मुलाची, तर शरद पवारांना मुलीची काळजी आहे. आता आपल्या सोबत खरी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आल्याचे आशिष शेलार यांनी म्हटले. त्यामुळे भाजप पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेसोबत जुळवून घ्यावे, असे आवाहनही शेलार यांनी महाविजय कार्यशाळेत (BJP Mahavijay Workshop) केले.

 

पवार-शिंदेंना मदत कामाला येईल

नरेंद्र मोदी 2024 मध्ये पुन्हा पंतप्रधान (PM Narendra Modi) पदाची शपथ घेतील तेव्हा राज्यातील 45 खासदार शपथ घेतील असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी म्हटले. गेल्या 32 वर्षात देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि माझ्यात एकमत राहिले आहे. आम्ही तुम्हाला 90 टक्के स्ट्राईक रेट देऊ. पण ज्याप्रकारे तयारी सुरु केली आहे, कुठेही मनाचे खच्चीकरण होणार नाही, याची काळजी घ्यावी असे आवाहनही बावनकुळे यांनी केले. एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) व अजित पवार यांनाही ती मदत कामाला येईल, असे बावनकुळे म्हटले.

 

तिन्ही पक्षांमध्ये समन्वय साधण्यासाठी समिती

महायुतीमधील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये समन्वय साधण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे.
या समितीमध्ये तिन्ही पक्षांमधील प्रत्येकी चार सदस्यांचा समावेश आहे.
एकूण 12 सदस्य समन्वय साधण्याचे काम करणार आहेत. भाजपकडून चंद्रशेखर बावनकुळे,
चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil), प्रसाद लाड (Prasad Lad),
आशिष शेलार (Ashish Shelar) यांचा समावेश या समितीमध्ये करण्यात आला आहे.
शिवसेना- शिंदे गटाकडून उदय सामंत (Uday Samant), शंभूराज देसाई (Shambhuraj Desai), दादा भुसे (Dada Bhuse), राहुल शेवाळे (Rahul Shewale) समितीत चर्चा करणार आहेत. तर, राष्ट्रवादी काँग्रेसकडून समन्वय समितीवर सुनील तटकरे (Sunil Tatkare), छगन भुजबळ (Chhagan Bhujbal), दिलीप वळसे पाटील (Dilip Valse Patil), धनंजय मुंडे (Dhananjay Munde) असणार आहेत.

 

Web Title : BJP Mahavijay Workshop | maharashtra-bjp-mahavijay-workshop-appeal-to-party-workers-work-together-with-ncp-and-shiv-sena

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा