Pune Lonikand Police News | विद्यार्थ्यांच्या रक्षणासाठी प्रत्येक शाळेत असणार पोलीस काका – पोलीस दीदी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Lonikand Police News | पुणे शहरातील वाढती गुन्हेगारी लक्षात घेत पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. पुणे पोलिसांमार्फत नवनवीन उपाययोजना आखण्यात येत असून नागरिकांच्या सुरक्षिततेची काळजी घेतली जात आहे. दरम्यान, या पुढे शाळांमध्ये पोलीस काका व पोलीस दीदी यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. रोड रोमियो व टवाळखोरांपासून विद्यार्थ्यांना कोणताही त्रास होऊ नये म्हणून ही खबरदारी घेण्यात येणार आहे. शालेय विद्यार्थिंनीचे रक्षण करण्यासाठी शाळेमध्ये पोलीस काका किंवा पोलीस दीदी उपस्थित असतील अशी माहिती लोणीकंद पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजित काईंगडे (Sr PI Vishvajeet Kaingade) यांनी दिली. (Pune Lonikand Police News)

 

शालेय विद्यार्थ्यांना खास करुन मुलींना टवाळखोऱ्यांपासून कोणताही त्रास होऊ नये व शाळेत येताना जाताना कोणताही अनुसुचित प्रकार घडू नये याकरिता नवे अभियान राबवण्यात येणार आहे. या अभिनयानांतर्गत प्रत्येक शाळेत हे पोलीस काका व पोलीस दीदी (Police Kaka – Police Didi) नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचबरोबर शाळेमध्ये या नियुक्ती करण्यात आलेल्यांची नावे व मोबाईल क्रमांक असलेले पोस्टर देखील वाटप करण्यात आले. वाघोलीमधील लेक्सिकॉन स्कुलमध्ये वाघोलीतील (Lexicon School Pune) सर्व शाळांच्या मुख्यधापकांची व संचालकांची बैठक बोलावण्यात आली होती. (Pune Lonikand Police News)

 

लेक्सिकॉन स्कुलमध्ये घेण्यात आलेल्या बैठकीमध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजित काईंगडे
यांनी स्वतः मार्गदर्शन केले. शाळेतील विद्यार्थ्यांवर विशेष लक्ष दिले जावे असे त्यांनी सुचविले.
शाळा भरण्याच्या वेळी व शाळा सुटण्याच्या वेळी शिक्षकांनी व कर्मचाऱ्यांनी गेट बाहेर उभे रहावे.
व विद्यार्थ्यावर लक्ष द्यावे. तसेच कोणताही संशयास्पद प्रकार आढळून आला तर लगेचच पोलिसांना कळवावे
असे आवाहन त्यांनी शालेय मुख्यधापक व संचालक यांना केले.
सदर बैठकीस वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजित काईंगडे, पोलीस निरीक्षक ( गुन्हे ) मारुती पाटील
(PI Maruti Patil), सीमा ढाकणे (PI Seema Dhakne), इतर अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

 

Web Title : Pune Lonikand Police News | Police Kaka – Police Didi will be there in every school to protect the students

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा