Varun Dhawan | वरुण धवन करत आहे ‘या’ गंभीर आजाराचा सामना

पोलीसनामा ऑनलाईन : सध्या वरुण धवन (Varun Dhawan) त्याच्या ‘भेडिया’ (Bhediya) चित्रपटामुळे चर्चेत आहे. हा चित्रपट कॉमेडी हॉररनी भरलेला असल्याने या चित्रपटाचा ट्रेलर चाहत्यांना खूपच आवडल्याचे पाहायला मिळाले. हा चित्रपट 25 नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सोबतच अभिनेत्री क्रिती सेनॉन (Kriti Sanon) देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सध्या वरुण धवन (Varun Dhawan) चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अनेक ठिकाणी अनेक कार्यक्रमात पाहायला मिळाला. यादरम्यानच वरुण धवनने एका गंभीर गोष्टीचा खुलासा केला आहे.

एका मुलाखतीत वरुण नी सांगितले की वरुण (Varun Dhawan) सध्या एका आजाराशी झुंजत आहे. वेस्टिब्युलर हायपोफंक्शन (Vestibular Hypofunction) असे आजाराचे नाव आहे. या आजारामुळे माणूस शरीराचा तोल गमावू शकतो. “कोविड नंतर मी कामाला सुरुवात केली, तेव्हा मला अनेक गोष्टींचा सामना करावा लागला. मी नेहमीच आयुष्यात संतुलन ठेवणे हे महत्त्वाचे समजायचो पण ही माझी गोष्ट चुकीची ठरली.
‘जुग जुग जियो’ (Jug Jug Jiyo) या चित्रपटासाठी मी स्वतःवर खूपच जास्त दबाव टाकले होते.
मात्र मला हे कळत नव्हते की मी माझ्यावर इतका का दबाव टाकत आहे. या सर्व समस्यांना सामोरे जात मी या चित्रपटात उत्तम असे काम केले”.

दिनेश विजन (Dinesh vijan) निर्मित ‘भेडिया’ हा चित्रपट प्रेक्षकांसाठी 25 नोव्हेंबरला 2D आणि 3D या दोन्ही प्रकारात रिलीज होणार आहे.
‘भेडिया’ या चित्रपटात वरून धवन हा भास्कर चोप्राच्या भूमिकेत दिसणार आहे तर क्रिती सेनॉन (Kriti Senon)
डॉक्टर अनिका कोठारीच्या भूमिकेत दिसणार आहे. ‘दिलवाले’ (Dilwale) या चित्रपटानंतर ही जोडी पुन्हा एकदा
प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Web Title :-  Varun Dhawan | varun dhawan reveals during bhediya promotion as he battling vestibular hypofunction

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Andheri East Bypoll Result 2022 | धनुष्यबाण गेला, पण मशाल धगधगली, 15 व्या फेरीअखेर ऋतुजा लटकेंची मोठी आघाडी

Devendra Fadnavis | राज्यसभा निवडणुकीत भाजपला मिळालेली जादा मतं कोणाची?, देवेंद्र फडणवीसांनी केला गौप्यस्फोट

Pune Police Inspcector Suspended | पुणे शहर पोलिस दलातील पोलिस निरीक्षक निलंबीत, जाणून घ्या कारण