Devendra Fadnavis | राज्यसभा निवडणुकीत भाजपला मिळालेली जादा मतं कोणाची?, देवेंद्र फडणवीसांनी केला गौप्यस्फोट

ADV

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची जादू संपूर्ण राज्याने पाहिले. राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadi) मत फोडत फडणवीस यांनी भाजपचा (BJP) उमेदवार जिंकून आणला. फडणवीसांनी नेमकी कोणाची मत फोडली हे अद्याप समजू शकले नाही. याबाबत खुद्द फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी एका मुलाखतीत गौप्यस्फोट केला आहे. राज्यसभा निवडणुकीत (Rajya Sabha Elections) फुटलेली मत ही शिंदे गटाची (Shinde Group) नव्हती, असा गौप्यस्फोट फडणवीस यांनी केला. त्यामुळे आता ही मत नेमकी कोणत्या पक्षाची होती यावरुन चर्चांना उधाण आले आहे.

राज्यसभा निवडणुकीत संख्याबळ नसताना देखील भाजपचा उमेदवार निवडून आला. यावेळी भाजपला महाविकास आघाडीतील आमदारांनी मत दिल्याची चर्चा सुरु होत्या. यानंतर काही दिवसांत शिवसेनेचे 40 आमदार (Shivsena MLA) बाहेर पडले आणि वेगळा गट तयार केला. या गटाने भाजपच्या मदतीने राज्यात सरकार स्थापन केले. त्यामुळे शिंदे गटाने त्यावेळी भाजपला मदत केल्याचे बोलले जात होते. मात्र आता या चर्चांना फडणवीसांनी पूर्णविराम दिला आहे.

ADV

राज्यसभा निवडणुकीत शिंदे गटाने मत दिली नव्हती असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)
यांनी केले आहे. त्यांच्या या गौप्यस्फोटानंतर भाजपला नेमकी कोणत्या पक्षाच्या आमदारांनी मत दिली,
या चर्चां सुरु झाल्या आहेत. तर काही दिवसांपासून काँग्रेसचे आमदार (Congress MLA) फुटणार असल्याच्या चर्चा
सुरु आहेत. शिवसेना नेते चंद्रशेखर खैरे (Chandrashekhar Khaire ) यांनीही यासंदर्भात वक्तव्य केले होते.

Web Title :-Devendra Fadnavis | excess votes that the bjp got in the rajya sabha election did not belong to the eknath shinde group says devendra fadnavis

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

T20 World Cup 2022 | दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का! भारताची सेमीफायनलमध्ये धडक

Ind vs Zim | मेलबर्नमधील सामन्यात रोहित शर्मा करणार टीममध्ये बदल? ‘या’ खेळाडूला संधी मिळण्याची शक्यता