Vastu Tips : चुकीच्या दिशेला झोपून करून घेऊ नका नुकसान ! ‘या’ 8 गोष्टींकडे ठेवा लक्ष

नवी दिल्ली : वास्तुशास्त्रात दिशांचे महत्व विशेष आहे. झोपताना डोके आणि पाय योग्य दिशेला असणे आवश्यक असते. ज्याप्रकारे चांगल्या आरोग्यासाठी पौष्टिक आहार घेतला जातो, त्याच प्रकारे नियमित दिनचर्येसाठी योग्य पद्धतीने झोप घेणेसुद्धा जरूरी आहे.

काही लोक कोणत्याही दिशेला पाय आणि डोके करून झोपी जातात, अशावेळी मानसिक त्रास आणि इतर नुकसान होऊ शकते. झोपण्यासंबंधी वास्तू टिप्स जाणून घेवूयात…

1 वास्तुनुसार उत्तर किंवा पश्चिम दिशेकडे डोके करून झोपल्यास निगेटिव्हीटी आणि स्ट्रेस वाढतो. यासाठी नेहमी दक्षिण किंवा पूर्वेकडे डोके करून झोपले पाहिजे.
2 तर अविवाहित मुलींनी झोपण्यासाठी उत्तर-पश्चिम दिशा निवडली पाहिजे. त्यांनी चुकूनही दक्षिण-पश्चिम दिशेला झोपू नये. विवाह योग्य मुले-मुलींसाठी उत्तर दिशेकडे पाय करून झोपणे सुद्धा ठिक आहे.
4 घराच्या वायव्य कोपर्‍यात विवाहित महिलांनी झोपू नये. या दिशेला झोपल्याने त्या वेगळे घर घेण्याचे स्वप्न पाहू लागतात.
5 वास्तुनुसार कुमारिकांनी उत्तर-पश्चिम दिशेला झोपले पाहिजे, यामुळे विवाहाचा योग मजबूत होतो.
6 सकाळी-सायंकाळी कापूर जाळून सर्व खोल्यांमध्ये दाखवल्याने घरातील नकारात्मक उर्जा नष्ट होते. अग्नि कोन म्हणजे दक्षिण-पूर्व दिशेला रोज सायंकाळी कापूर जाळल्याने धनवृद्धी होते.
7 घरात झोपण्याच्या ठिकाणी प्लास्टिकची फुले आणि झाडे ठेवू नये, यामुळे दारिद्रय वाढते.
8 प्रत्येक पोर्णिमेच्या दिवशी घराच्या उंबरठ्यावर हळदीने स्वस्तिक काढणे शुभ मानले जाते.