‘वीर-दीपा’ बांधणार लगीनगाठ 

मुंबई : पोलीसनामा  ऑनलाईन

बॉलिवूड मध्ये आघाडीच्या अभिनेत्रींनपैकी  दीपिका पादुकोण आता रणबीर सोबत  साखरपुडा  करणार आहे. ऑनस्क्रीन केमिस्ट्रीसोबतच ऑफस्क्रीन केमिस्ट्रीमुळेही चर्चेत असणारी बॉलिवूड जोडी म्हणजे अभिनेत्री दीपिका आणि  अभिनेता रणवीर सिंग हे एका इटलीतील नयनरम्य ठिकाणी जाऊन साखरपुडा करणार आहेत. एका चित्रपटाच्या निमित्ताने ही जोडी एकत्र आली आणि तेव्हापासून त्यांच्यात असलेलं मैत्रीचं नातं आणखी खुलत गेलं.आजच्या घडीला त्यांच्या मैत्रीचं प्रेमात रुपांतर झालं असून, या वर्षअखेरीस ते लग्नगाठ बांधणार असल्याचं म्हटलं जात आहे. नोव्हेंबर महिन्यात त्यांचा विवाहसोहळा पार पडणार असल्याचं बोललं  जात आहे.

[amazon_link asins=’B0756ZJKCY’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’bcfee544-9176-11e8-a4aa-952f1105368d’]

बॉलिवूडच्या परंपरागत चालत आलेल्यानुसार अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि क्रिकेटर विराट कोहली यांनी ज्याप्रमाणे परदेशात म्हणजेच इटलीला जाऊन मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत लग्नसोहळा पार पाडला आणि अखंड साथ देऊ अशी  शपथ घेतली होती, त्याचप्रमाणे दीपिका आणि रणवीरही इटलीलाच डेस्टिनेशन वेडिंग करणार असल्याचं कळत आहे.

मिळालेल्या  माहितीनुसार इटलीतील ‘लेक कोमो’, या नयनरम्य ठिकाणी हा विवावहसोहळा पार पडणार आहे. ‘फिल्मफेअर’नेही याविषयीचं वृत्त प्रसिद्ध करत ‘वीर-दीपा ’ इटलीतील लोम्बा येथे असणाऱ्या कोमो लेक येथे एका दिमाखदार सोहळ्यात १० नोव्हेंबरला विवाहबद्ध होतील असं म्हटलं आहे.इटलीच्या उत्तर भागामध्ये हे   सुरेख  आणि नयनरम्य ठिकाण आहे.  लग्न करण्यालाच दीपिका आणि रणवीरने प्राधान्य दिल्याचं कळत आहे. या लेकच्या किनाऱ्यालगत सुंदर व्हिला आहेत, त्यामुळे या लेकच्या आणि  परिसराच्या सौंदर्यात  आणखीनच भर पडत आहे. यापूर्वी  दीपिका पादुकोण आणि रणबीर सिंगने अनेक चित्रपट दिले आहेत.