ज्योतिष : शुक्राचा मिथुन राशीत प्रवेश ; जाणून घ्या कोणत्या राशीवर काय परिणाम

पोलीसनामा ऑनलाईन – ज्योतिष शास्त्रानुसार, प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात शुक्र ग्रहाचे खूप महत्व आहे. शुक्र ग्रहाला भौतिक सुख सुविधेचा कारक मानलं जात. इतर ग्रहांसारख शुक्र ग्रहाचा देखील चांगला किंवा वाईट परिणाम मनुष्याच्या जीवनावर होत असतो. या ग्रहाचा परिणाम व्यक्तींच सौंदर्य आणि आरोग्य यावर देखील होतो.

लवकरच शुक्र ग्रह आपल्या मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार, शुक्र ग्रहाचा मिथुन राशीत प्रवेश झाल्यामुळे काहींना फायदा तर काहींना तोटा होऊ शकतो.

मेष रास – नवीन व्यापारात खूप फायदा होईल. उपाय – शुक्रवारी गाईला चपाती खाऊ घाला. गुलाबाचे पदार्थ दान करा.

वृषभ – भाषेमध्ये खूप फायदा होईल. थकलेले धन परत मिळेल. . कार्यक्षेत्र बदलण्याची शक्यता आहे. उपाय – पांढऱ्या कपड्याचे दान करा

मिथुन – शुक्रचा मिथुन राशीत प्रवेश झाल्यामुळे विवाहासंबंधित समस्या कमी होतील. उपाय – शुक्राय नमः मंत्राचा १०८ वेळा संध्याकाळी जप करा. दह्याचे दान करा.

कर्क – खर्चात वाढ होईल. लहान मुलींना लेखन साहित्य पुरवावे. परदेश दौऱ्याचा फायदा होईल. उपाय – गरिबांना दान करा.

सिंह – या राशीच्या ११ व्या घरात शुक्राचा प्रवेश. नोकरी व्यापारामध्ये फायदा होईल. प्रेमप्रकरणात फायदा होईल. उपाय – भगवान लक्ष्मी नारायणाला पंचामृत अर्पण करा तसेच लाल वस्त्र परिधान करा.

कन्या – शुक्राच्या प्रवेशामुळे सन्मान वाढेल. मित्रांची मदत मिळेल. उपाय – पांढऱ्या चंदनामध्ये गंगाजल मिसळून टिळा लावा. गुलाबी वस्त्र अवश्य धारण करा.

तूळ – या राशीच्या नवव्या भागात शुक्राचा प्रवेश होईल. शारीरिक त्रास कमी होतील. धनांमध्ये वाढ होईल. उपाय – पूर्व दिशेला तुपाचा दिवा लावा आणि आचरणावर लक्ष ठेवा.

वृश्चिक – या राशीच्या आठव्या भागात शुक्राच्या प्रवेशाने आरोग्यामध्ये बिघाड होईल आणि वैवाहिक जीवन देखील खराब होईल. उपाय – शुक्रवारी संध्यकाळी शुक्राच्या मंत्राचा जप करा आणि सोबतच तांदुळाच्या भाताचे दान एका महिलेला करा.

धनु – या राशीच्या सातव्या भागात शुक्र प्रवेश करेल. त्यामुळे जोडीदारबरोबरील संबंध सुधारतील तसेच विवाहासंबंधी सर्व प्रकरणात फायदा होईल उपाय – शुक्रवारी भगवान शंकराला खिरीचे दान करा आणि गरजू लोकांना मदत करा.

मकर – या राशीत शुक्राच्या प्रवेशामुळे कष्ट जास्त करावे लागतील. फायदा कमी होईल पण जुन्या कर्जापासून सुटका होईल. उपाय – निर्धन स्त्रीला पैसे देऊन मदत करा आणि भगवान शंकराला पंचामृताचा अभिषेक करा.

कुंभ – प्रेमप्रकरणात यश मिळेल. विवाहामधील अडथळे दूर होतील. अभ्यासात मन लागेल. उपाय – साबुदाण्याची खीर लहान मुलांमध्ये वाटा आणि निर्धन स्त्रीला मदत करा.

मिन – शुक्र ग्रहाच्या प्रवेशामुळे भौतिक सुख तसेच संपत्तीमध्ये वाढ होईल. आरोग्य सुधारेल. उपाय – शुक्रवारी गरजू लोकांना जेवण खाऊ घाला. शूक्राय नमः हा मंत्र दिवसभर म्हणा.

आरोग्य विषयक वृत्त

संधिवाताच्या रुग्णांना कोणते खाद्यपदार्थ ठरू शकतात फायदेशिर, जाणून घ्या

समस्या चुटकीसरशी घालवणाऱ्या घरगुती उपायांमागील विज्ञानही माहिती हवे

आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांवर घरच्याघरी होऊ शकतात उपाय

हेअर ड्रायरचा अतीवापर ‘केसां’साठी धोकादायक