अभिनेते दिलीप कुमार हिंदुजा रुग्णालयात !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – ९८ वर्षांचे ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार Dilip Kumar यांना मुंबईतील हिंदूजा रुग्णालयात Hinduja Hospital दाखल करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे त्यांना रुग्णालयात Hinduja Hospital दाखल करण्यात आल्याची माहिती दिलीप कुमार Dilip Kumar यांच्या पत्नी अभिनेत्री सायरा बानू यांनी दिली आहे.

दिलीप कुमार Dilip Kumar यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने रविवारी सकाळी ८ वाजता खार येथील हिंदुजा रुग्णालयात आणण्यात आले आहे.
त्यांची प्रकृती स्थिर आहे.
दिलीप कुमार यांच्या शरीरात हिमोग्लोबिनची कमतरता आहे.
त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून दर महिन्याला त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात येतं.

 

READ ALSO THIS :

Lockdown in Pune : …म्हणून पुण्याची तिसर्‍या स्तरात घसरण

हृदय निरोगी ठेवण्यासाठी रोज सकाळी रिकाम्यापोटी प्या ‘हा’ स्पेशल ज्यूस; जाणून घ्या
पोलीसनामा ऑनलाइन टीम – ह्रदय शरीरातील सर्वात महत्वाचा अवयव आहे. शरीराच्या सर्व भागात रक्त पोहचवणे, सर्व भागातून रक्त घेणे, रक्त पंप करणे अशी महत्वाचे कामे हृदय करते. हे काम करताना हृदय heart healthy आकुंचन आणि प्रसरण पावत असते. या कार्यात बाधा आल्यास हृदयसंबंधी heart healthy आजारांचा धोका वाढतो. यासाठी योग्य दिनचर्या, योग्य आहार आणि रोज व्यायाम करा. सोबतच रोज सकाळी रिकाम्यापोटी हा स्पेशल ज्यूस प्या.

जर तुम्हाला याबाबत माहिती नसेल तर जाणून घेवूयात…
रिसर्च गेटवर प्रसिद्ध एका शोधात या फळाबाबत सविस्तर सांगण्यात आले आहे. या फळात आयुर्वेदिक गुण आढळतात जे आरोग्यासाठी लाभदायक आहेत. विशेषकरून लठ्ठपणा, उच्च रक्तदाब, तणाव आणि हृदयासंबंधी आजारासाठी हे फळ एखाद्या वरदानापेक्षा कमी नाही. डॉक्टरसुद्धा किवीचा ज्यूस पिण्याचा सल्ला देतात.

संशोधनात सांगितले आहे की, किवीमध्ये पोटॅशियम आणि फायबर आढळते. याच्या सेवनाने हृदय निरोगी राहते. किवीतील फायबर वाढत्या कोलेस्ट्रॉलला कंट्रोल करते. यामुळे हृदयसंबंधी आजार आणि हार्ट अटॅकचा धोका कमी होतो.यासाठी कोरोना काळात रोज रिकाम्यापोटी किवी ज्यूस प्या. याशिवाय रिसर्च गेटवर प्रसिद्ध एका अन्य संशोधनात उच्च रक्तदाबाच्या रूग्णांनी आठवड्यात 8 किवी खाण्याचा सल्ला दिला आहे.