‘डेटिंग’च्या बातम्यांदरम्यानच डिनरला बरोबर दिसले ‘विक्की-कॅटरिना’

पोलीसनामा ऑनलाइन टीम – बॉलिवूड स्टार विकी कौशल आणि कॅटरीना कैफ यांच्या अफेअरबद्दल गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू आहे. अशातच विकी आणि कॅटरीना पुन्हा एकदा एकत्र स्पॉट झाले आहेत. प्रोड्युसर आरती शेट्टीकडील डिनरच्या निमित्तानं दोघं पुन्हा एकदा एकत्र दिसले आहेत. विकी आणि कॅटरीना कैफ त्यांच्याच गाडीनं डिनरसाठी आले होते.

विकी आणि कॅटरीनाचे एकत्र स्पॉट झाल्याचे काही फोटो समोर आले आहेत. लुकबद्दल बोलायचं झालं तर कॅटरीना व्हाईट आउटफिटमध्ये दिसली. विकीच्या लुकबद्दल बोालयचं झालं तर त्यानं ब्लॅक शर्ट घातला होता.

अनेक दिवसांपासून विकी आणि कॅटरीना एकमेकांना डेट करत आहेत अशा बातम्या समोर येताना दिसत आहेत. दोघांनीही आपल्या नात्याबद्दल अधिकृत वक्तव्य केलेलं नाही.

विकीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर लवकरच तो सरदार उधम सिंह या सिनेमात काम करणार आहे. पंरतु कोरोनामुळं या सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे. आता हा सिनेमा जानेवारी 2021 मध्ये रिलीज होणार आहे.

https://www.instagram.com/p/B9shgexBCxX/

कॅटरीनाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायाचं झालं तर लवकरच ती सूर्यवंशी सिनेमात दिसणार आहे. हा सिनेमा 24 मार्च 2020 रोजी रिलीज होणार होता. परंतु कोरोनामुळं सिनेमाची रिलीज डेट टाळण्यात आली आहे.

https://www.instagram.com/p/B9mRazoB6QV/

https://www.instagram.com/p/B9a-uU4BPTI/

https://www.instagram.com/p/B8xkcz0BOoc/