Vicky Kaushal | विकी कौशलचा भन्नाट डान्स व्हिडिओ व्हायरल; बायकोच्या ‘या’ गाण्यावर केला डान्स

पोलीसनामा ऑनलाईन टीम – मनोरंजन सृष्टीतील लोकप्रिय जोडींमध्ये अभिनेता विकी कौशल (Actor Vicky Kaushal) आणि अभिनेत्री कटरीना कैफ (Actress Katrina Kaif) यांचे नाव आवर्जून घेतले जाते. सध्या विकी त्याच्या आगामी चित्रपट ‘गोविंदा मेरा नाम’ मुळे चर्चेत आहे. त्याचबरोबर हे दोघेही एकमेकांच्या कामाचे भरभरून कौतुक करतानाही दिसतात. याआधी विकीने अनेक मुलाखतींमध्ये कॅटरिनाच्या कामाचा चाहता असल्याचे सांगितले आहे. तर सध्या विकीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विकीने (Vicky Kaushal) एका कार्यक्रमात कॅटरिनाच्या गाजलेल्या आयटम सॉंगवर ठेका धरला आहे.

 

गोविंदा नाम मेरा या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. प्रेक्षकांनी या ट्रेलरला भरभरून प्रेम दिले यातच विकी या चित्रपटांमुळे चर्चेत आहे. तर एका कार्यक्रमात त्यांनी कॅटरिना कैफच्या ‘चिकनी चमेली’ या गाण्यावर नाच देखील केला आहे. सध्या त्याच्या या डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. हा व्हिडिओ ‘गोविंदा मेरा नाम’ या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्चच्या वेळेचा असल्याचे सांगितले जात आहे.

 

 

यावेळी स्टेजवर विकी सोबत भूमी पेडणेकर आणि कियारा अडवाणी (Bhumi Pednekar, Kiara Advani) देखील दिसत आहेत. तर विकीने ‘चिकनी चमेली’ या गाण्यांची हुकअप स्टेप केली आहे. यावेळी तो अत्यंत आनंदी असल्याचे दिसत आहे. तर त्याच्या डान्सवर प्रेक्षकही फिदा झाल्याचे दिसत आहेत. सोशल मीडियावर या व्हिडिओला आतापर्यंत अनेक व्ह्यूज आणि कमेंट्स देखील आले आहेत.

‘गोविंदा मेरा नाम’ हा चित्रपट 16 डिसेंबर रोजी डिज्नी प्लस हॉटस्टार वर प्रदर्शित होणार आहे.
शशांक खैतान यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. तर करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनने याची निर्मिती केली आहे.
पहिल्यांदाच हे तीन कलाकार एकत्र काम करताना दिसणार आहेत.
या चित्रपटाच्या ट्रेलरमुळे प्रेक्षकांना या चित्रपटाची आतुरता लागली आहे.

 

Web Title :- Vicky Kaushal | vicky kaushal danced on katrina kaifs famous item song chikani chameli

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Raj Thackeray | तेजस्विनी पंडित बरोबरच्या मुलाखतीत राज ठाकरेंची दिलखुलास फटकेबाजी; म्हणाले, ‘मी स्वतः कसा दिसतो, हे…’

Pune Crime | सेक्स्टॉर्शनमध्ये राजस्थानचे एक संपूर्ण गाव सहभागी; पुण्यातील तरुणांच्या आत्महत्येमुळे खुलासा

PM Narendra Modi | अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या हस्तकांकडून पीएम नरेंद्र मोदींच्या हत्येचा कट, ‘त्या’ ऑडिओ मेसेजनं प्रचंड खळबळ