Vicky Kaushal | विकी कौशलने सांगितल्या लग्नाच्या दिवसातील आठवणी: म्हणाला, “ते दिवस माझ्या आयुष्यातील…”

पोलीसनामा ऑनलाइन – बॉलीवुडमधील लोकप्रिय कपलमध्ये अभिनेत्री कतरिना कैफ आणि अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal And Katrina Kaif) यांचे नाव अग्रस्थानी येते. कतरिना आणि विकी हे रोमॅंटिक कपल नेहमी एकमेंकांवरचे प्रेम व्यक्त करत असतात. अनेकदा ते सोशल मीडियावर कपल फोटो शेअर करत असतात. या जोडीचा मोठा चाहता वर्ग असून त्यांच्या चाहत्यांना या कपलच्या लाईफ अपडेट जाणून घेण्यासाठी उत्सुकता असते. मात्र ते आपल्या पसर्नल लाईफ बद्दल बोलणे टाळत असतात. यावेळी मात्र विकीने (Vicky Kaushal) त्याच्या काही सवयींबद्दल एका मुलाखतीमध्ये सांगितले आहे. अभिनेता विकी कौशलने हे कबुल केले आहे की त्याच्या आयुष्यामध्ये त्यांच्या लग्नाचे दिवस हे खूप स्पेशल होते.

अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री कतरिना कैफ यांनी 2021 साली लग्नगाठ (Vicky Kaushal And Katrina Wedding) बांधली. त्यापूर्वी अनेकदा त्यांच्या अफेअरच्या चर्चा रंगत होत्या. मात्र लग्नापर्यंत त्यांनी आपल्या रिलेशनबाबत गुप्तता बाळगली. विकी आणि कतरिनाच्या ड्रीम वेडिंगचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले होते. त्यांनी राजस्थान (Rajasthan) मधील सिक्स सेंस फोर्ट येथे शाही विवाह केला. यावेळी कतरिनाला नवरीच्या लूकमध्ये पाहून नेटकरी घायाळ झाले होते. त्यानंतर हे कपल अनेकदा एकत्र स्पॉट होत असतात. अनेक मुलाखतींमध्ये देखील एकमेकांवरील प्रेम व्यक्त करतात. यावेळी विक्कीने कतरिना वरचे प्रेम व्यक्त केले असून तो म्हणाला की कतरिना ही माझ्यासाठी खूप महत्त्वाची व्यक्ती असून लग्नाचे दिवस हे आयुष्यातील खूप स्पेशल आहेत.

विकी कौशलने त्याच्या पहिल्या ऑडिशन बद्दल सांगितले. तो म्हणाला की, जेव्हा त्याने पहिले ऑडिशन क्रॅक केले होते तेव्हा त्याने ही गुड न्यूज पहिल्यांदा आईला सांगितली होती. ही गोष्ट ऐकून त्याच्या आईने नाचायला सुरुवात केली होती. विकी कौशलने पुढे सांगितले की, “जेव्हा मला कोणतीही बातमी शेअर करायची असते तेव्हा मी आधी कतरिनाला कॉल करतो.” तसेच अभिनेता विकी कौशलने त्याच्या लग्नातील तीन दिवस त्याच्या आयुष्यातील सर्वोत्तम असल्याचे देखील कबुल केले आहे. मुलाखतीमध्ये विकीला त्याच्या लव लँग्वेजबद्दल विचारले तेव्हा विकीने सांगितले की, मी एक टिपिकल पंजाबी व्यक्ती आहे. झप्पी ही नेहमीच आमची प्रेम व्यक्त करण्याची भाषा राहिली आहे.

अभिनेता विकी कौशल व अभिनेत्री कतरिना कैफ (Vicky Kaushal And Katrina Kaif) हे लोकप्रिय कपल आहे. विकीचा नुकताच ‘जरा हटके जरा बचके’ (Zara Hatke Zara Bachke) हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. यामधील त्याची आणि सारा अली खान (Sara Ali Khan) सोबतची ऑनस्क्रीन कॅमिस्ट्री प्रेक्षकांना आवडली. लवकरच विकीचा ‘सॅम बहादूर’ (Sam Bahadur Movie) व ‘डंकी’ (Dunki Movie) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. अभिनेत्री कतरिना कैफ ही सलमान खानसोबत (Salman Khan) ‘टायगर 3’ (Tiger 3) मध्ये झळकणार आहे. ही जोडी अनेक वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन करणार असल्यामुळे चाहत्यांना उत्सुकता आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | बनावट कागदपत्रांच्या आधारे पुण्यातील बँकेसह वित्तीय संस्थेची कोट्यवधीची फसवणूक, तीन जणांवर FIR