#Video Viral : सपना चौधरीच्या ‘या’ डान्सचे चाहते झाले ‘दिवाने’

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – हरियाणवी डान्सर सपना चौधरी सध्या आपल्या डान्स स्टाईलमुळे चर्चेचा विषय बनली आहे. सपनाचे चाहते नेहमी तिच्या डान्सच्या व्हिडिओची उत्सुकतेने वाट बघत असतात. सपनाचा पुन्हा एक नवीन डान्सचा व्हिडीओ समोर आला आहे आणि व्हिडीओ मध्ये सपनाचा एक अनोखा लुक समोर आला आहे. पटियाला सुट मध्ये सपना चौधरी ‘कुर्ती ढीली आंख जहरीली’ गाण्यावर धमाकेदार डान्स करतांनाच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

 

व्हिडीओ मध्ये सपनाचे चाहते तिच्या डान्सचा व्हिडीओ मोबाइल मध्ये शुट करतांना दिसत आहेत. सपनाने हरियाणवी गाण्यावर उत्तम प्रकारे डान्स स्टेप केल्या आहेत. ज्यामुळे सपना फेमस झाली आहे. सपना लाईट पिंक कलर सुट मध्ये दिसते आहे. डान्स बघितल्यानंतर चाहते सोशल मीडियावर आपली प्रतिक्रिया देत आहेत. सपना चौधरीचे स्टेजवरील शोज हरियाणा व्यतिरिक्त राजस्थान, एमपी, बिहार आणि युपी मध्ये देखील हिट होत आहेत.