Video : बाप रे ! रागात जया बच्चन यांनी दिला सेल्फी घेणाऱ्याला धक्का; नेटकऱ्यांनी केलं प्रचंड ट्रोल

पोलीसनामा ऑनलाइन टीम – बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री आणि राजकारणी जया बच्चन या नेहमी त्यांच्या रागामुळे वादाच्या भोवऱ्यात असतात. याच कारणामुळे अनेक वेळा जया सोशल मीडियावर ट्रोल देखील झाल्या आहेत. असेच काही तरी जया यांच्यासोबत पुन्हा घडले आहे. सध्या पश्चिम बंगालमध्ये निवडणूक सुरू आहेत तर TMC पक्षासाठी प्रचार करताना जया बच्चन दिसल्या. त्याच प्रचार रॅलीमधला जया बच्चन यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

जया बच्चन या पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांना पाठिंबा देण्यासाठी प्रचारात सहभागी झाल्या होत्या ज्या रॅलीतला हा व्हिडीओ एका नेटकऱ्याने शेअर केला. या विडिओ मध्ये जया बच्चनसोबत सेल्फी घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका चाहत्याला रागात धक्का मारुन त्यांनी खाली ढकललं.