खुशखबर ! ‘सेट टॉप’ बॉक्सच्या माध्यमातून करता येणार ‘व्हिडिओ कॉलिंग’, ‘Jio’ देणार ‘या’ धमाकेदार सुविधा, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय इंटरनेट क्षेत्रात जिओने धमाकेदार ऑफर आणि प्लॅन ग्राहकांना उपलब्ध करुन दिले आहेत. त्यामुळे भारतीय बाजारात इतर कंपनींशी स्पर्धा वाढणार आहे. भारतीय बाजारात सध्या इंटरनेट उपलब्ध करुन देणाऱ्या अनेक कंपन्या आहेत. त्यात ब्राडबॅन्ड क्षेत्रात नॅशनल आणि स्थानिक अशा अनेक कंपन्यांचा समावेश होतो. परंतू या सर्व कंपन्यांना धासती आहे ती जिओ गिगा फायबरची.

सेट टॉप बॉक्सच्या माध्यमातून व्हिडिओ कॉल –

याचा रिलायन्स इंडस्ट्री लिमिटेडने ग्राहकांना एक नवीन गिफ्ट दिले आहे. आता तुम्ही घर बसल्या सेट टॉप बॉक्सच्या मदतीने व्हिडिओ कॉल करु शकतात. यासाठी सेट टॉप बॉक्सला गिगा फायबर नेटवर्कने जोडावे लागेल. कंपनी उपलब्ध करुन देत असलेली ही सुविधा म्हणजे डिजिटल युगातील एक क्रांती समजली जात आहे. या संबंधित माहिती देताना कंपनीने आपल्या एजीएममध्ये उपलब्ध करुन देत असलेल्या सुविधांची माहिती दिली आहे.

सर्वात मोठी करदाता कंपनी –

AGM मध्ये रिलायन्सचे मुकेश अंबानी यांनी सांगितले की, पंतप्रधानांनी २०२० पर्यंत ५ लाख कोटी डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्याचे लक्ष ठेवले आहे. मला वाटते भारत हे लक्ष सहज साध्य करेल. ते म्हणाले की RIL सर्वात मोठी करदाता कंपनी आहे. मागील वित्त वर्षात कंपनीने ६७३२० कोटी रुपये GST दिला आहे. तर १२१९१ कोटी आयकर स्वरुपात दिला आहे.

आरोग्यविषयक वृत्त –