Video : ‘या’मुळे रितेश देशमुखने खाल्ला चपलेने मार?; बघा नक्की काय झाले

पोलीसनामा ऑनलाइन टीम –   बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख हा महाराष्ट्राचा एक लोकप्रिय अभिनेता आहे. रितेश त्याच्या सोशल मीडियावर हल्ली खुपच सक्रिय असतो. तो नेहमीच फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करताना दिसतो. सध्या त्याचे आणि जेनेलियाचे कॉमेडी व्हिडीओ हे सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसतात. आता रितेशचा आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत त्याने सकाळी उशिरा उठल्यावर काय होतं ते सांगितलं आहे.

या व्हिडीओत रितेशने पांढऱ्या रंगाचे टी-शर्ट घातला आहे. तर तो ज्युस पिताना दिसत आहे. त्या व्हिडीओमध्ये एक आवाज रितेशला विचारते की, “तू सकाळी उशिरा उठलास तर तुला काय खायला मिळते?” तर, त्याला उत्तर देत रितेश म्हणतो की, “चप्पल”. या विडिओ ला कॅपशन म्हणून रितेशने ‘शुभ सकाळ’ असे लिहिले आहे. हा विडिओ फारच विनोदी असून सोशल मीडियावर प्रचंड विरळ होत आहे.