Video : सारा अली खान आणि कार्तिक आर्यन पुन्हा ‘एकत्र’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – कार्तिक आर्यन आणि सारा अली खान सध्या दोघेही चर्चेमध्ये आहे. दोघेही नेहमी एकत्र स्पॉट होतात. काही दिवसांपुर्वी असे समजले होते की, कार्तिक आणि सारा आता पुन्हा एकत्र दिसणार नाही पण आता दोघेही एका चित्रपटात सोबत काम करताना दिसणार आहे. इम्तियाज अली यांचा चित्रपट ‘लव आज कल २’ मध्ये सारा आणि कार्तिक दोघेही दिसणार आहे.

याबाबतीत इम्तियाज अली यांनी सांगितले होते की, सारा आणि कार्तिक यांनी चित्रपटाच्या सेट व्यतिरिक्त बाहेर भेटणे कमी केले पाहिजे. इम्तियाज अली यांना वाटते की, दोघेही जास्त भेटले तर यांचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल होतील. यामुळे चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच प्रेक्षक या जोडीला कंटाळतील. त्यामुळे चित्रपट प्रदर्शित होईपर्यंत दोघांनीही बाहेर एकमेकांना भेटू नये.

असे समजले आहे की, इम्तियाज यांच्याबरोबरच साराची आई अमृता यांना सुद्धा सारा आणि कार्तिक यांचे भटणे पसंत नाही. असे असून देखील दोघेही नुकतेच स्पॉट झाले आहे. यांचा एक व्हिडिओ देखील सोशल मिडियावर व्हियरल झाला आहे. यामध्ये सारा आणि कार्तिक एकत्र दिसून येत आहे. या दोघांनी मिडियाला पाहताच वेगळे झाले. व्हिडिओमध्ये साराने सलवार सूट घातला आहे. कार्तिकने रेट जॅकेट घातले आहे. दोघेही खूप क्यूट दिसत आहे.

आरोग्य विषयक वृत्त –

ब्लड ऑन कॉलवर विधानसभेत चर्चा, आरोग्य मंत्र्यांनी दिले उत्तर

ह्रदयाची घ्या अशी काळजी , कधीही होणार नाहीत ब्लॉकेजेस …!

हे उपाय करा आणि ” मणक्याच्या आजाराला ” पळवून लावा

चांगली झोप येत नाही ? करा हे उपाय