Vidhan Sabha Speaker Rahul Narvekar | आमदार अपात्रता प्रकरणाच्या सुनावणीत वकिलांमध्ये खडाजंगी, वैयक्तिक टीका, अध्यक्षांनी व्यक्त केली नाराजी

मुंबई : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी (Shiv Sena MLA Disqualification Case) विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Vidhan Sabha Speaker Rahul Narvekar) यांच्या समोर आजपासुन पुन्हा सुनावणी सुरू झाली आहे. आजच्या सुनावणीत शिंदे गटाचे (Shinde Group) वकील महेश जेठमलानी (Advocate Mahesh Jethmalani) आणि ठाकरे गटाचे (Thackeray Group) वकील देवदत्त कामत (Advocate Devdutt Kamat) यांच्यात झालेल्या खडाजंगीत दोघांनी वैयक्तिक टीका केली. यानंतर विधानसभा अध्यक्षांनी (Vidhan Sabha Speaker Rahul Narvekar) नाराजी व्यक्त केली.

व्यक्तिगत टीका करू नका, तुमचा मुद्दा कायदेशीररित्या मांडा, असे म्हणत वकील जेठमलानी आणि वकील कामत यांच्यातील वैयक्तिक टीकेवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नाराजी व्यक्त केली. सुनावणीत शिवसेना शिंदे गट आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Balasaheb Thackeray) गटाच्या वतीने वकिलांनी जोरदार युक्तिवाद केला. यावेळी दोन्ही गटाच्या वकिलांमध्ये खडाजंगी झाली.

कागदपत्रे सादर करण्यासाठी शिंदे गटाने मुदतवाढ मिळावी, अशी विनंती केली. ती मान्य करण्यात आली. शिंदे गटाला कागदपत्रे सादर करण्यासाठी वेळ वाढवून देण्यात आला आहे. तर, ठाकरे गटाकडून कागदपत्रे सादर करण्यात आली आहेत.

यावेळी ठाकरे गटाच्या वकिलांनी सुनील प्रभूंच्या साक्षीचे वाचन केले. या साक्षीनुसार संबंधित कागदपत्रे ठाकरे गटाने सादर केली. ही साक्ष विधिमंडळाकडून नोंदवून घेण्यात आली. कोणतीही चूक होऊ नये यासाठी एक मोठी स्क्रीन लावली होती. (Vidhan Sabha Speaker Rahul Narvekar)

या सुनावणीत शिवसेना ठाकरे गटाने काही महत्वाचे पुरावे आज सादर केले. शिवसेनेत पडलेल्या
फुटीवेळी पक्षाने पाठवलेल्या नोटीस, वृत्तपत्रांची कात्रणे, पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)
आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde)
यांचे आभार मानण्यासाठी केलेल्या पोस्ट हे सर्व पुरावे म्हणून ठाकरे गटाने सादर केले आहे.

सर्व युक्तिवाद व आक्षेपाचे व्हिडीओ रेकॉर्डिंग करण्याची मागणी ठाकरे गटाचे वकिल देवदत्त कामत यांनी केली.
परंतु ही मागणी विधानसभा अध्यक्षांनी मान्य केली नाही.
सर्व युक्तिवाद व आक्षेप रेकॉर्डवर घेतले जात असल्याचे अध्यक्ष म्हणाले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

आमदार अपात्रता प्रकरण : शिंदे गट अडचणीत? सुनावणीत ठाकरे गटाने दिले ‘हे’ पुरावे