‘मग मला पाडून दाखवा’, अजितदादांनी भर सभागृहात स्वीकारलं मुनगंटीवार यांचं चॅलेंज

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा (Vidhansabha winter session) दुसऱ्या दिवशीही सभागृहात सत्ताधारी पक्ष व विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी सुरु आहे. आज अधिवेशनाचा दुसरा आणि शेवटचा दिवस आहे. याच दरम्यान, आज सभागृहात उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि भाजप नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir mungantiwar) यांच्यातील शाब्दिक युद्ध हे सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

पुरवणी मागण्यांवर आज विधानसभेत चर्चा सुरु आहे. आमदार सुधीर मुनगंटीवार मुद्दे मांडत असताना सभागृहात सदस्य उत्तर देण्यासाठी उभे राहिले होते. त्याचवेळी सुधीर मुनगंटीवार यांनी त्यावर ‘माझ्या भाषणात अडथळा आणतो तो पुन्हा कधीच जिंकू शकत नाही’ असा मिश्किल टोला त्यांनी लगावला.

सुधीर मुनगंटीवार यांच्या या टिप्पणींवर अजित पवार यांनी उत्तर देत ‘मी तुमचं आव्हान स्वीकारतो (Accept Challenge), मला पाडून दाखवा’ असं म्हणत मुनगंटीवार यांना थेट चॅलेंजचं दिलं आहे. अजित पवारांनी दिलेल्या या आव्हानानंतर सुधीर मुनगंटीवार यांनीही गुगली टाकली. मुळात पाडण्याचे दोन प्रकार आहेत. एक लोकशाहीमध्ये आणि दुसरा 23 नोव्हेंबरचा आहे. हे आम्ही करुन दाखवले आहे., असं काय करता दादा, आमचं तुमच्यावर खूप प्रेम आहे, असं मुनगंटीवार म्हणाले असता सभागृहात एकच हश्शा पिकली.

तेव्हा माझ्यासमोर बाळासाहेब ठाकरे आले

मुख्यमंत्री, अजित पवार आणि माझा व देवेंद्र फडणवीस यांचा जन्म जुलै महिन्यातील आहे. जुलै महिन्यातील व्यक्तीमत्वाचे गुण मी पाहिले. त्यात एक वाक्य लिहलंय. आी-वडिलांना त्रास होईल असा कोणताही व्यवहार जुलैमध्ये जन्म झालेल्या व्यक्ती करत नाही. तेव्हा माझ्यासमोर हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आले. त्याचवेळी मी बाळासाहेब याचे व्हिडिओ पाहिले, त्यांची भाषणे ऐकली, असा टोला मुनगंटीवार यांनी लगावला.