Vijay Deverakonda | विजय देवरकोंडा लवकरच जाहीर करणार गर्लफ्रेंडचे नाव; फोटो केला शेअर

पोलीसनामा ऑनलाइन – दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेता विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda) याची लोकप्रियता अफाट आहे. विजयच्या चित्रपटांसोबतच त्याच्या वैयक्तिक आयुष्याची जोरदार चर्चा रंगलेली असते. अभिनेता विजय देवरकोंडा याचा मोठा चाहता वर्ग असून त्यांच्या चाहत्यांना विजयच्या लव्ह अफेअरबद्दल उत्सुकता आहे. विजयचे नाव दाक्षिणात्य लोकप्रिय अभिनेत्री रश्मिका मंदाना सोबत (Rashmika Mandanna) जोडले जाते. या कपलचा मोठा चाहता वर्ग असून अनेकदा ते क्वालिटी टाईम स्पेंड करताना स्पॉट होतात. अद्याप रश्मिका व विजय यांनी त्यांच्या नात्याची कबुली दिलेली नाही. मात्र अभिनेता विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda) याने त्याच्या इंस्टाग्रामवर एका मुलीचा हात हातामध्ये घेऊन फोटो शेअर केला आहे. या स्टोरीमुळे विजयच्या अफेअरच्या चर्चांनी जोर धरला आहे.

अभिनेता विजय देवरकोंडा हा सध्या त्याच्या आगामी ‘खुशी’ या चित्रपटामुळे (Kushi Movie) चर्चेत आला आहे. यामध्ये तो अभिनेत्री सामंथा रूथ प्रभु (Samantha Ruth Prabhu) सोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. विजयच्या अफेरच्या चर्चा मनोरंजन विश्वामध्ये नेहमीच रंगत असतात. पण आता या सर्व चर्चांना लवकरच पूर्णविराम लागण्याची शक्यता आहे. लवकरच तो आपल्या गर्लफ्रेंडचे नाव जाहीर करणार असल्याचे संकेत विजयने दिले आहे.

सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या विजयचे इंस्टाग्रामवर 19 मिलियन्स फॉलोवर्स आहेत. त्याने नुकतीच एक स्टोरी शेअर केली आहे. यामध्ये त्याने एका मुलीचा हात हातात घेतलेला फोटो शेअर केला आहे. सोबत लिहिले आहे की, ‘खूप काही घडत आहे, पण हे खूप खास आहे… लवकरच जाहीर करू.’ असे कॅप्शन दिले आहे. त्याच्या या कॅप्शनमुळे चर्चांना उधाण आले आहे. हा हात नक्की कोणाचा आहे असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे. आणखी एक स्टोरी शेअर करत विजयने तो आज संध्याकाळी लाईव्ह येणार असल्याचे जाहीर केले आहे. या लाईव्हमध्ये तो आपल्या गर्लफ्रेंडचे (Vijay Deverakonda Girlfriend) नाव जाहीर करणार असल्याची अपेक्षा चाहत्यांना आहे.

Advt.

अभिनेता विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda) याचे नाव अभिनेत्री रश्मिका मंदाना
(Vijay Deverakonda And Rashmika Affair) सोबत जोडले जाते. त्याच्या अफेअरच्या चर्चा खूप रंगतात.
अनेकदा ते क्वालिटी टाईम स्पेंड करत असतात. या कपलची ऑनस्क्रीन व ऑफस्क्रीन जोडी प्रेक्षकांना खूप आवडते.
विजय व रश्मिका यांनी ‘गीता गोविंदम’ (Geetha Govindam) आणि ‘डिअर कॉमरेड’ (Dear Comrade) या
चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. विजय़ आज रश्मिकाचे आणि त्याचे नाते जाहीर करणार की त्याची कोणी दुसरीच
गर्लफ्रेंड असल्याचे जाहीर करणार याबद्दल नेटकऱ्यांना उत्सुकता लागली आहे.
विजय देवरकोंडा याच्या आगामी ‘खुशी’ चित्रपटाची प्रेक्षकांना प्रतिक्षा आहे.
‘खुशी’ चित्रपट येत्या 1 सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या (Kushi Movie Release Date) भेटीस येणार आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

ACB Trap News | 60 हजार रुपये लाच स्वीकारताना भूमी अभिलेख कर्यालयातील दोन भूमापक अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

Multibagger Stocks | ४८ रुपयांचा शेअर ४८०० च्या पार… या हॉस्पिटल स्टॉकने गुंतवणुकदारांना बनवले करोडपती

Financial Rules Changing in Sep 2023 | हे नियम बदलणार, नुकसान टाळण्यासाठी आजच पावले उचला