Vijay Shivtare | शिवसेनेचे माजी मंत्री विजय शिवतारे यांची पक्षातून हकालपट्टी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Vijay Shivtare | आम्हीच शिवसेना (Shivsena) आहोत असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि त्यांच्या गटाने करत महाविकास आघाडीविरोधात (Mahavikas Aghadi) बंड पुकारले आहे. शिवसेनेचे ५५ पैकी ४० आमदार शिंदे गटात सामील झाले आहेत. त्यामुळे शिवसेनेत उभी फूट पडली आहे. केवळ आमदारच नाही तर माजी मंत्री, आजी – माजी पदाधिकारी, नगरसेवक, खासदारही शिंदे गटात सहभागी होत आहे. (Vijay Shivtare)

 

दरम्यान, शिवसेनेने बंडखोरी करणाऱ्यांवर कारवाई करण्यास सुरुवात केली असून शिंदे गटात सहभागी होणाऱ्या नेत्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात येत आहे. नुकतेच पुणे जिल्ह्यातील शिवसेनेचे माजी मंत्री विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांची पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shivsena Chief Uddhav Thackeray) यांनी पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे हकालपट्टी केली आहे. शिवतारे यांचे सदस्यत्त्व रद्द करण्यात आले असल्याची माहिती  शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून देण्यात आली आहे. यापूर्वी पुण्यातील नगरसेवक शिंदे गटात सामील झाले आहेत त्यामुळे पुण्यामध्ये शिंदे गटाचा सेनेला मोठा फटका बसला आहे.

काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao Patil) यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शुभेच्छा देणारी पोस्ट व्हायरल झाली होती. त्यामुळे आढळराव पाटील यांच्या हकालपट्टीची बातमी सामना दैनिकातून छापण्यात आली. त्यानंतर आढळराव पाटील यांनी नाराजी व्यक्त केली तर अनावधानाने आढळराव पाटील यांची बातमी प्रसिद्ध झाली असं सांगत उद्धव ठाकरे यांनी ते शिवसेनेतच आहेत असं म्हटलं.

 

पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे ठाण्याचे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली.
मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही कारवाई बेकायदेशीर असल्याचं सांगत जिल्हाप्रमुखपदी म्हस्के यांच्या पुनर्नियुक्तीची घोषणा केली.
परंतु , म्हस्के यांचा सेनेशी काहीही संबंध नसून हे वृत्त निराधार आहे.
शिवसैनिकांनी भूलथापांना बळी पडू नये, शिवसेनेत पक्षप्रमुखांशिवाय कोणीही कोणाचीही नियुक्ती करू शकत नसल्याचं खडसावण्यात आलं.

 

Web Title :- Vijay Shivtare | expulsion of former minister vijay shivtare of shiv sena in pune district uddhav thackerays orders

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा