Vijay Wadettiwar | महाराष्ट्रात शिवाजी महाराजांची तलवार आणल्याने रोजगार येणार आहेत का? – विजय वडेट्टीवार

मुंबई: पोलीसनामा ऑनलाइन – मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज (Chatrapati Shivaji Maharaj) यांची जगदंबा तलवार ब्रिटनला आहे. ती महाराष्ट्रात परत आणण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकार हालचाली करत आहेत. त्यावर आता काँग्रेसचे (Congress) माजी मंत्री आणि आमदार विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी भाष्य केले आहे. तलवारीने राज्यातील युवकांचे रोजगार परत येणार आहेत का? असा प्रश्न विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी उपस्थित केला आहे.

शिवाजी महाराजांनी वापरलेली जगदंबा तलवार परत भारतात आणण्याची घोषणा राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी केली आहे. त्याचा आम्हाला आनंद आहे. त्यांच्या या भूमिकेचे आम्ही स्वागतच करत आहोत. पण महाराष्ट्राबाहेर गेलेले उद्योग धंदे कोण परत आणणार? हजारो युवकांच्या हातचे काम यावेळी निघून गेले आहे. त्यामुळे त्यांनी तलवारीसोबत उद्योग देखील आणावेत. उद्योग गेले आणि रोजगार गेला. त्यामुळे महाराष्ट्राचे प्रचंड नुकसान झाले आहे. आता हे सरकार लोकांच्या भावनेशी खेळून राजकारण करत असल्याचे वडेट्टीवार म्हणाले. त्यामुळे रोजगार आणि तलवार दोनही आणण्याची भूमिका सत्ताधाऱ्यांनी घेतली पाहिजे, असे विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) म्हणाले. तलवारीने राज्यातील युवकांचे रोजगार परत येतील का ? छत्रपती शिवाजी महाराजांची तलवार परत आणा. या त्यांच्या निर्णयाचे स्वागत आहे. पण शिंदे फडणवीस सरकारच्या काळात इतर राज्यात गेलेले महाराष्ट्रातील उद्योग कोण परत आणणार ?, असा प्रश्न देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला.

गुरुवारी सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शिवाजी महाराज यांची तलवार महाराष्ट्रात परत आणण्यासाठी
हालचाली करत असल्याचे सांगितले. ऋषी सुनक (PM Rushi Sunak) आता ब्रिटनेचे पंतप्रधान झाले आहेत.
त्यामुळे त्यांच्यासोबत योग्य तो पत्रव्यवहार करुन ती तलवार भारताला मिळावी,
अशी मागणी मुनगंटीवार यांनी केली होती.

Web Title :-  Vijay Wadettiwar | Bringing Shivaji Maharaj’s sword to Maharashtra will bring employment?

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update