Vijay Wadettiwar Letter To Governor | वडेट्टीवारांचे राज्यपालांना पत्र, म्हणाले – ‘विधानसभेचे दोन दिवसाचे विशेष अधिवेशन बोलवा’

मुंबई : Vijay Wadettiwar Letter To Governor | राज्यात सध्या आरोग्य यंत्रणेचा मुद्दा अतिशय गंभीर बनला आहे. नांदेडच्या शासकीय रुग्णालयात औषध आणि इतर सुविधांअभावी ४ दिवसात ५१ रुग्ण दगावले आहेत. इतर ठिकाणी देखील अशीच स्थिती आहे. एकुणच कोलमडलेली आरोग्य यंत्रणा, राज्यातील बिघडलेली कायदा व सुव्यवस्था, दुष्काळाची स्थिती, राज्य सरकारची मनमानी आदी विषयासंदर्भात चर्चेसाठी विधिमंडळाचे दोन दिवसाचे विशेष अधिवेशन बोलवावे, अशी विनंती विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राज्यपालांना पत्र पाठवून केली आहे. (Vijay Wadettiwar Letter To Governor)

आरोग्य मंत्र्यांचा राजीनामा घ्या

विजय वडेट्टीवार यांनी राज्यपालांना पाठवलेल्या पत्रात मागणी केली आहे की, राज्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये झालेल्या मृत्यूंसंदर्भात निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमावी. प्रत्येक मृत व्यक्तिच्या कुटुंबियांना प्रत्येकी रु. १० लाखांची आर्थिक मदत करावी. उच्च न्यायालयाने प्रकरणाची दखल घेतली आहे. हे राज्य सरकारचे अपयश आहे.त्यामुळे आरोग्य मंत्री यांचा राजीनामा घेण्यात यावा. (Vijay Wadettiwar Letter To Governor)

कंत्राटी भरतीचा निर्णय तात्काळ रद्द करा

राज्यातील इतर प्रश्न मांडताना वडेट्टीवार यांनी पत्रात नमूद केले आहे की, राज्यामध्ये तरुण बेरोजगारांची संख्या मोठया प्रमाणात आहे. असे असताना शासनाने शासकीय सेवेतील विविध पदे नऊ कंपन्यांमार्फत कंत्राटी स्वरुपात भरण्याचा निर्णय घेऊन राज्यातील विविध स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची फसवणूक केली आहे. याव्दारे अप्रत्यक्षपणे विविध संवर्गातील जसे अनुसूचित जाती अनुसूचित जमाती, ओबीसी व भटक्या विमुक्त जमातीचे आरक्षण रद्द करण्याचा प्रयत्न आहे. तरी शासनसेवेतील पदे कंत्राटी स्वरुपात भरण्याचा हा शासननिर्णय तात्काळ रद्द करावा.

जालना लाठीमाराची चौकशी करा

जालना लाठीमार प्रकरणाचा उल्लेख करत वडेट्टीवार यांनी राज्यपालांकडे मागणी केली आहे की, जालना येथे मराठा आरक्षणाच्या उपोषणावेळी सरकारने जालना जिल्हयातील अंतरवाली सराटी या गावात आंदोलकांवर पोलिसांनी अमानुषपणे लाठीमार केला.

एकंदरीतच मराठा, ओबीसी व धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसंदर्भातील आंदोलन हाताळण्यात सरकारला अपयश आले आहे. राज्यातील विविध जाती-जमातीतील सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्याचे काम शासनाने केले आहे. तरी जालना जिल्ह्यातील या लाठीचार्जची निवृत्त न्यायाधिशांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समितीची नेमणूक करून चौकशी करावी.

शासकीय कर्मचारी, अधिकारी यांना दमदाटी

शासकी पातळीवर सत्ताधारी लोप्रतिनिधींच्या मनमानीबाबत या पत्रात म्हटले आहे की, सत्ताधारी पक्षातील काही खासदार,
आमदार व लोकप्रतिनिधी यांचे अधिकारी/कर्मचारी यांना दमदाटी करण्याचे प्रकार वाढले आहेत. या संदर्भात गृह विभागाला कायदा सुव्यवस्था राखण्यात अपयश आले आहे. त्यामुळे शासकीय कर्मचाऱ्यांमध्ये सत्ताधारी लोकप्रतिनिधींबद्दल नाराजीचे वातावरण आहे.

तात्काळ दुष्काळ घोषित करा

राज्यातील शेतकर्थ्यांची गंभीर आवस्था वडेट्टीवार यांनी राज्यपालांना पाठवलेल्या पत्रात मांडताना म्हटले आहे की,
राज्यात दुष्काळी स्थिती असुनसुध्दा सरकारने दुष्काळ घोषित न केल्याने शेतकरी व जनावरांचे मोठ्या प्रमाणात हाल
होत आहेत. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई अद्याप शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेली नाही.

शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या

शासनाच्या शेतकऱ्यांविषयीच्या असंवेदनशील धोरणामुळे विदर्भ व मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढलेल्या आहेत.
शासनाप्रती शेतकऱ्यांमध्ये नाराजीची भावना निर्माण झाली आहे. तरी या संदर्भात शासनाने तात्काळ दुष्काळ घोषित करुन,
दुष्काळाच्या उपाययोजना करण्याबाबत आपण शासनास निर्देशित करावे.

राज्याची कायदा व सुव्यवस्था बिघडलेली

राज्यातील बिघडलेल्या कायदा आणि सुव्यवस्थे संदर्भात या पत्रात वडेट्टीवार यांनी नमूद केले आहे की,
महिलांवरील बलात्कार, विनयभंग, छेडछाड असे प्रकार वाढले आहेत. महिलांच्या अपहरणाच्या गुन्ह्यांमध्ये २२
टक्क्यांने वाढ झाली आहे. राज्याच्या गृहविभागाच्या अहवालानुसार गुन्हेगारीमध्ये वाढ झाली आहे.
एकंदरीतच राज्याची कायदा व सुव्यवस्था बिघडलेली आहे. तरी या संदर्भात राज्यपालांनी स्वतः बैठक घेऊन लक्ष घालावे.
उपरोक्त नमुद वस्तुस्थिती लक्षात घेता, या विषयासंदर्भात चर्चा करण्यासाठी आपण विधिमंडळाचे दोन दिवसाचे
विशेष अधिवेशन बोलवावे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Congress Mohan Joshi – Shivaji Nagar ST Stand | शिवाजीनगर एसटी स्थानक 15 दिवसात निर्णय घ्या, अन्यथा मुख्य मंत्र्यांना अडवू; माजी आमदार मोहन जोशी यांचा इशारा