‘वाका-वाका’ फेम शकीरावर ‘त्या’ प्रकरणी लावले ‘हे’ गंभीर आरोप

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – कोलंबियाची सुपस्टार आणि विख्यात गायिका शकीरा १४.५ मिलियन यूरो कर फसवणूकीचा आरोपात गुरुवारी बार्सिलोनाच्या न्यायालयात पोहचली. या गायिकेवर चाललेल्या खटल्याची सुनावणीनुसार १० वाजता सुरु होणार होती. असे समजले जाते की, अमेरिकेची ही गायिका शकीरा स्पेनमध्ये फुलबॉलर गेर्रार्ड पीके आणि आपल्या दोन मुलांसोबत राहत आहे.

२०११ पासून २०१४ पर्यंंत स्पेनमध्ये राहून देखील तिने कर भरला नाही. असा तिच्यावर आरोप होता पण तेथिल वृत्त संस्थेने माहिती दिल्यानूसार शकीराने पुर्ण कर भरला आहे.

२०१० चा फीफा वर्ल्ड कपचे ऑफीशियल थीम सॉन्ग ‘वाका वाका’ कोलंबिया की सुपरस्टार शकीराने गायले होते. जे की, खूप प्रसिद्ध झाले होते. २०१६ मध्ये या गाण्याला यूट्यूबवर अब्ज व्ह्यूज मिळाले होते यासोबतच शकीरा हा आकडा पार करणारी तिसरी लॅटिन कलाकार बनली होती. त्याआधी तिने ब्रूनो मार्सचे गाणे ‘अपटाउन फंक’ आणि एनरीक इग्लेसियसचे २०१४ चे हिट सिंगल ‘बाइलांदो’ चे शिखर गाठले आहे.