Vikram Gokhale | ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांची तब्येत खालावली; पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरु

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन- भारतीय सिनेमात उत्कृष्ठ अभिनयासाठी ओळखले जाणारे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले (Vikram Gokhale) यांची तब्येत खालावली आहे. उपचारासाठी त्यांना दीनानाथ मंगेशकर रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गेल्या १५ दिवस त्यांच्यावर (Vikram Gokhale) या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

विक्रम गोखले (Vikram Gokhale) यांची तब्येत आता अजूनच खालावली असल्याची माहिती आता समोर येत आहे. गेल्या १५ दिवसांपासून डॉक्टर त्यांच्यावर लक्ष ठेऊन आहेत. त्यातच त्यांची तब्येत अजून बिघडली असल्याची माहिती बाहेर येत आहे. त्यांच्यावर होणाऱ्या उपचारांना त्यांच्याकडून म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नसल्याचे बोलले जात आहे. परंतु, त्यांच्या कुटुंबीयांकडून अद्याप याविषयी कोणतेही निवेदन किंवा माहिती समोर आलेली नाही.

अभिनेते विक्रम गोखले यांनी गेल्याच महिन्यात ३० ऑक्टोबर रोजी वयाच्या ८२ व्या वर्षात पदार्पण केले.
पण काहीच दिवसात त्यांच्या तब्येतीविषयी चिंताजनक माहिती समोर आली. विक्रम गोखले यांनी रंगभूमी, टेलिव्हिजन आणि सिनेमा अशी सर्व व्यासपीठ गाजवली आहेत. त्यांना उत्कृष्ठ अभिनयासाठी राष्ट्रीय फिल्म पुरस्कार आणि रंगभूमीवरील अभिनयासाठी संगीत नाट्य अकादमीचा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. त्यांचे अभिनय क्षेत्रातील कार्य अथांग आहे.

Web Title :- Vikram Gokhale | Great actor vikram gokhale hospitalized undergoing treatment at Deenanath Mangeshkar Hospital pune

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Jalna ACB Trap | माजी सैनिकाकडून नोझल मशीनच्या स्टॅम्पिंगसाठी लाच मागणारा अधिकारी अटकेत, जालन्यातील घटना

Shraddha Walker Murder Case | श्रद्धाच्या पत्रावर पोलिसांनी कारवाई का केली नाही? देवेंद्र फडणवीसांकडून चौकशीचे आदेश

Pune Crime | माझी बायको होशील का? 13 वर्षाच्या मुलीसाठी 14 वर्षाच्या मुलाचे इंस्टाग्राम स्टेटस; हडपसर परिसरातील नामांकित शाळेतील प्रकार